महाशिवरात्रिनिमित्त विश्वेश्वर महाराजांचा यात्रोत्सव

दगाजी देवरे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

गावातील तरुण पुरोहित गणू महाराजांनी भक्त निवासासाठी आर्थिक मदत दिली आहे.ग्रामपंचायतीने मंदिराजवळ पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यंदा गणू महाराज एक क्विंटल साबुदाणा खिचडी महाप्रसाद वाटप करणार आहेत.

धुळे (म्हसदी) : येथील देऊर रस्त्यावरील विश्वेश्वर(महादेव) मंदिराजवळ दरवर्षी महाशिवरात्राला आजपासून यात्रा भरत आहे.यात्रेनिमीत्त दोन दिवस भंजन, किर्तन, अभिषेक, होमहवन, जलकुंभ पुजन, महाप्रसाद वाटप, लोकनाट्य तमाशा आदी विविध कार्यक्रम होतील.

येथील देऊर रस्त्यावर उमरावती,अमरावती व देवनदीच्या त्रिवेणीसंगमावर 42 फुट उंच विश्वेश्वर महाराजांचे मंदिर आहे.1979 मध्ये गावातील 27 लोकांनी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्याच सत्तावीस लोकांचे विश्वेश्वर जीर्णोध्दार सेवा मंडळ मंदिराचे काम पाहते.मंदिरात महादेवाची पिंड, त्रीमुखी दत्त, नंदी, दुर्गादेवी, पंचमुखी हनुमानाची संगमरवरी मुर्त्या आहेत. सुरुवातीला सभासद लोकवर्गणीतून मंदिराचे काही काम झाले आहे.गेल्या दोन वर्षांपासून येथील धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने मंदिर परिसराच्या विकास कामास मोठे पाठबळ दिले आहे. मंडळाने मंदिरास तारेचे कुंपन,स्वागत दरवाजासाठी सहकार्य केले.तसेच नुकतेच मंडळाने महिलांसाठी जलकुंभ व्हावा म्हणून सव्वा लाख रुपये आर्थिक सहकार्य केले आहे.

गावातील तरुण पुरोहित गणू महाराजांनी भक्त निवासासाठी आर्थिक मदत दिली आहे.ग्रामपंचायतीने मंदिराजवळ पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यंदा गणू महाराज एक क्विंटल साबुदाणा खिचडी महाप्रसाद वाटप करणार आहेत. मदिर परिसरात उपहारगृह,खेळणी विक्रेते, रसवंतीची दुकाने लावतात.वर्षभर याठिकाणी हरतालीका,ऋषी पंचमी,नवरात्र,श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते. उद्या (ता.13) पहाटे मंदिरात महाअभिषेक,होमहवन,अग्नी पुजा होईल.दुपारी साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटप होईल.भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विश्वेश्वर जीर्णोध्दार मंडळाचे अध्यक्ष अर्जुन सीताराम देवरे,उपाध्यक्ष यादवराव तानाजी देवरे,सचिव सुभाष रुपचंद चित्तम व संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: Marathi news Dhule news Mahashivratri in Dhule