दोन तासात दिड लाख गणिती उदाहरणांची आकडेमोड 

Marathi News Dhule News Mathematics Two Hours One and half lakh Math equations
Marathi News Dhule News Mathematics Two Hours One and half lakh Math equations

धुळे - पिंपळनेर (ता.साक्री) येथील (कै.) एन. एस. पी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्ताने सुमारे दिड लाख गणिती उदाहरणे सोडवून विद्यार्थ्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. गणितातील पायाभूत संबोध हे बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यावर आधारित असतात. नेमके हेच संबोध दृढ करण्यासाठी विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या सातशे पंचवीस विद्यार्थ्यांनी शालेय ताशीकेतील पहिल्या चार तासात (घड्याळी दोन तास) प्रत्येकी दोनशे पन्नास उदाहरण सोडवून सुमारे दिड लाखांपर्यंत उदाहरण सोडवून एक रेकॉर्ड केला. लिम्का बुकमध्ये नोंद होण्यासाठी विद्यालयातर्फे प्रयत्न सुरु झाले आहेत.

पिंपळनेरच्या पाटील विद्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. गणित दिनानिमित्ताने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. दुपारच्या सत्रात सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची गणितावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमासाठी धुळे येथील घासकडबी शैक्षणिक संस्थेचे सचिव एन. एम. जोशी, दीपाली दाभाडे, ललित कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान उपक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक डी. एस. जगताप, स्पर्धा परीक्षा प्रमुख सचिन शिवाजी जाधव, वाघ. पी. एस, दशपुते व्ही. व्ही. गांगुर्डे, पी. जी. बेडसे, एन. बी नेरकर यांनी केले.

हा उपक्रम राबवत असताना विद्यार्थी दोन तास रमलेत. उपक्रमाचा लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड नोंदवला जावा म्हणून प्रयत्न सुरु आहे, असे पिंपळनेरचे स्पर्धा परीक्षा प्रमुख सचिन शिवाजी जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com