दोंडाईचातील बालिका अत्याचार प्रकरणी 30 वर्षीय नराधमाला अटक 

Dhule
Dhule

धुळे : माजी कामगार, न्याय व विधी राज्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रंथालय सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष यांनाही आरोपीच्या यादीत टाकल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या पातळीवर "हॉट इश्‍यू' झालेल्या दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील बालिका अत्याचार प्रकरणातील अज्ञात नराधम, मुख्य आरोपी रेवनाथ रामसिंग भगत (भिल, वय 35, रा. म्हाळसानगर, दोंडाईचा) याला अटक करण्यात "एसआयटी'च्या पथकाला यश आले. 

जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, 'एसआयटी' पथकप्रमुख व अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांनी पत्रकार परिॆषदेत आज (रविवारी) ही माहिती दिली. 

गुन्हा दाखल 
दोंडाईचा येथे आठ फेब्रुवारीला बालवाडीतील पाच वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने लैंगिक अत्याचार केला. माजी मंत्री व कॉंग्रेसचे नेते डॉ. हेमंत देशमुख अध्यक्ष असलेल्या ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संस्थेच्या नूतन हायस्कूलच्या मागे असलेल्या जागेत शाळेच्या मधल्या सुटीत विद्यार्थिनीवर अत्याचार झाला. नंतर तिचे गुप्तांग व पोट दुखू लागले. यासंदर्भात पीडित कुटुंब मुलीला घेऊन जळगाव येथे नातलगांकडे केले. तेथील उपचारात अत्याचार झाल्याचे निदान झाल्यावर 18 फेब्रुवारीला जळगावला अज्ञात नराधमासह हे प्रकरण दडपण्याचा, धमकीसह दबाव टाकून लपवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याच्या आरोपातून पीडित आईच्या फिर्यादीनुसार माजी मंत्री देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, दोंडाईचा पालिकेचे माजी बांधकाम सभापती, शिक्षक महेंद्र पाटील, प्रतीक महाले, नंदू सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 

मूक महामोर्चाचे आयोजन 
जळगावहून दोंडाईचा येथे हे प्रकरण वर्ग झाल्यानंतर महेंद्र पाटीलला अटक झाली. तो न्यायालयीन कोठडीत आहे. देशमुखव्दयी, महाले, सोनवणे बेपत्ता आहेत. विद्यमान रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे. असे असताना बालवाडीतील विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याने जिल्ह्यासह खानदेशात जनआक्रोश उसळला. शहरात 85 संघटना, संस्थांकडून आठ मार्चला मूक महामोर्चाचे आयोजन सुरू आहे. 

"एसआयटी' पथकाकडून तपास 
या प्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनॉयकुमार चौबे यांनी गुरुवारी (ता. 1) आठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. त्यात पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांचे पर्यवेक्षण, पथकप्रमुख अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे आणि तपासाधिकारी शिरपूरचे विभागाचे उपअधीक्षक संदीप गावित यांनी दोंडाईचाचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि अन्य सदस्यांच्या सहकार्याने तपासाला गती दिली. श्री. पानसरे आणि पथकाने शनिवारी दुपारी दोनपासून रात्री बारापर्यंत दोंडाईचा पोलिस ठाण्यात तळ ठोकला. पीडित विद्यार्थिनीसह नूतन हायस्कूल मुख्याध्यापिका सुनंदा भामरे व वर्गशिक्षिकेची चौकशी सुरू केली. अज्ञात नराधमाचा शोध सुरूच ठेवला. 

नराधमाकडून कबुली 
तीन दिवसांपासून संकलित होत असलेल्या विविध माहितीच्या आधारे शनिवारी (ता. 3) दोंडाईचा येथेच 35 वर्षीय नराधम पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याला पीडित मुलीने आेळखले आहे. 

पोलिसांनी विक्षिप्त, महिलांच्या छेडखानीसह तत्सम स्वरूपाच्या गुन्ह्यातील किंवा प्रकारातील व्यक्तींचे माहिती संकलन सुरू केले. यातून त्या नराधमाचा सुगावा लागला. नंतर त्याला ताब्यात घेतले. ती मुलगी दिसली, तिला कॅडबरी दाखविली, ती घेण्यासाठी आली आणि मी तिला नूतन हायस्कूलमागील जागेत असलेल्या पडक्‍या घराच्या अंगणातील ओट्यावर अत्याचार केल्याचे त्याने सांगितले. तो अविवाहित आहे. त्याने एकदा मुलीचा हात धरल्याने त्याला जमावाने ठोकून काढल्याचीही घटना घडलेली आहे. जनआक्रोशामुळे नराधम "एसआयटी'च्या हाती लागल्याने अनेकांनी सुटकेचा श्‍वास सोडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com