ग्रामीण भागात आदर्श विद्यार्थी घडविणारे 'आदर्श विद्या मंदिर'

jaitane
jaitane

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : साक्री तालुक्याच्या माळमाथा परिसरातील ग्रामीण, गरजू, गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने संस्थेचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष विष्णुदास रामदास शाह यांच्यासह तत्कालीन मोजक्या शिक्षणप्रेमी संचालकांनी एकत्र येऊन निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून गावात 21 जून 1957 रोजी 'तमसोमा ज्योतिर्गमय' हे ब्रीदवाक्य घेऊन आदर्श विद्या मंदिर नावाची माध्यमिक शाळा सुरू करत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व अखंड तेवत राहणारा 'आदर्श'रूपी 'ज्ञानदीप' प्रज्वलीत केला. संस्थेने नुकतेच एकसष्ठीत पदार्पण केले आहे.

आदर्श शैक्षणिक संकुलाचा विस्तार
त्यानंतर संस्थेने जून 1981 मध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन विभागांतर्गत कला व वाणिज्य शाखा, 1989 मध्ये विज्ञान शाखा तर 1993 मध्ये किमान कौशल्य विभाग सुरू केला. सन 1984 पासून स्वतंत्र तांत्रिक विभागही सुरू आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह यांच्यासह संचालक मंडळाच्या प्रयत्नांनी जून 1995 मध्ये आदर्श कला महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यांनतर सन 2003 मध्ये संस्थेने आदर्श प्राथमिक विद्यालयाची स्थापना करून दर्जेदार प्राथमिक शिक्षणाचीही सोय उपलब्ध करून दिली आहे.

स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकावा म्हणून सन 2013 मध्ये संस्थेने आदर्श प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुलची स्थापना केली. आज संस्थेच्या एकाच संकुलात पहिलीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्यातही मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमाची सोय आहे. कनिष्ठ महाविद्यालयात संगणक व इलेक्ट्रॉनिक्स हे ऐच्छिक विषय उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संस्थेने विज्ञान शाखेची दुसरी विनाअनुदानित तुकडीही सुरू केली आहे. 

संस्थेचे दिवंगत संचालक व पदाधिकारी
कै. विष्णुदास रामदास शाह, कै. जगन्नाथ कडवादास शाह, कै. मणीलाल उत्तमदास शाह, कै. राजेश्वरबुवा उपासनी, कै. डॉ. शांतीलाल मोहनलाल गुजराथी, कै. दगडू तानाजी वाणी, कै. कृष्णा नारायण जाधव, कै. कृष्णा आत्माराम वाणी, कै. यादव सखाराम पगारे, कै. जगन्नाथ नारायण वाणी, कै. बाळकृष्ण रामदास शाह, कै. जगन्नाथ तानाजी वाणी, कै. बळीराम बुधा पगारे, कै. कै. गोविंद सीताराम वाणी, कै. मुरलीधर दगडू वाणी, कै. गजानन उर्फ भय्या उपासनी, कै. सुशीलचंद्र जगन्नाथ शाह आदी...

संस्थेचे आजपर्यंतचे अध्यक्ष व त्यांचा कालखंड...
१.कै. विष्णुदास रामदास शाह (१९५७-१९६४),
२.कै. जगन्नाथ कडवादास शाह (१९६४-१९९९),
३.कै. जगन्नाथ नारायण वाणी (१९९९-२००२),
४.कै. बाळकृष्ण रामदास शाह (२००२-२००४),
५.कै. बळीराम बुधा पगारे (२००४-२००७),
६.कै. गोविंद सीताराम वाणी (२००७-२०१४),
७.श्री. दशरथ नारायण जाधव (२०१४ ते आजपर्यंत).

शाळेचे दिवंगत, माजी मुख्याध्यापक व त्यांची कारकीर्द...
१.कै. बी. आर. पाटील (१९५७-१९६१),
२.कै. व्ही. के. घरटे (१९६१-१९६८),
३.कै. जी. एल. बुवा (१९६८-१९७०),
४.कै. आर. एल. शाह (१९७०-१९७२),
५.कै. व्ही. के. घरटे (१९७२-१९८७),
६.कै. आर. एल. शाह (१९८७-१९९५),
७.श्री. यू. एफ. सूर्यवंशी (१९९५-१९९६),
८.श्री. एन. जी. वाणी (१९९६-२०००),
९.श्री. डी. जे. वाणी (२०००-२०००),
१०.श्री. आर. सी. शाह (२०००-२०००),
११.श्री. एच. डी. दवे (२०००-२००१),
१२.श्री. एम. एस. वाणी (२००१-२००८),
१३.श्री. यू.एस.कोठावदे (२००८-२०११),
१४.श्री. एस. बी. सोंजे (२०११-२०११),
१५.श्री. डी.एल. चव्हाण (२०११-२०१६),
१६.श्री. एम.बी.भावसार (२०१६-२०१७).

संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ...
१.श्री. दशरथ नारायण जाधव (अध्यक्ष),
२.ऍड. शरदचंद्र जगन्नाथ शाह (अध्यक्ष, वरिष्ठ महाविद्यालय),
३.श्री. सुहास विष्णुदास शाह (उपाध्यक्ष),
४.श्री. बारीक यादव पगारे (संचालक),
५.श्री. नितीन मणीलाल शाह (सचिव), ६.श्री. किशोर शांतीलाल शाह(सहसचिव), ७.श्री. अजितचंद्र जगन्नाथ शाह (अध्यक्ष, शालेय समिती)
८.श्री.दत्तात्रय जगन्नाथ वाणी(खजिनदार), ९.श्री. विठ्ठलराय राजेश्वर उपासनी (संचालक),
१०.श्री. राजेंद्र जगन्नाथ वाणी (संचालक), ११.श्री. राजेंद्र मुरलीधर वाणी (संचालक), १२.श्री. राघो बळीराम पगारे (संचालक).

अडीच हजारांवर विद्यार्थी संख्या... माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाची एकूण विद्यार्थी संख्या सुमारे अडीच 
हजारावर असून त्यात सुमारे 70 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह व शालेय समितीचे अध्यक्ष अजितचंद्र शाह यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. संचालक मंडळाला शिक्षकांचेही मौलिक सहकार्य लाभत आहे. मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संस्थेच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. शाळेचे दिवंगत मुख्याध्यापक व्ही. के. घरटे, आर. एल. शाह, माजी मुख्याध्यापक एन. जी. वाणी आदींची कारकीर्द विशेष उल्लेखनीय आहे.

स्वतंत्र डिजिटल क्लासरूम, रात्रीची अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा
शाळेत स्वतंत्र डिजिटल क्लासरूम असून तालुक्यातील मोठे समृद्ध ग्रंथालयही आहे.
दहावी-बारावीच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी 7 ते 9 दरम्यान रात्रीची अभ्यासिकाही सुरू करण्यात आली आहे. सोयीसुविधायुक्त प्रशस्त प्रयोगशाळा आहे. इंग्लिश मिडीयम व प्राथमिक शाळेच्या स्वतंत्र इमारती आहेत. संस्थाचालकांसह शिक्षक, शाळेचे माजी विद्यार्थी, हितचिंतक आदींच्या सहभागातून शाळेत विविध सुविधांची निर्मिती केली आहे. त्यात डिजिटल क्लासरूमसह पेव्हरब्लॉक, इंग्रजी माध्यम शाळेची इमारत आदींचा समावेश आहे. एनसीसी विभागासह भव्य क्रीडांगण आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध स्पर्धा व उपक्रमही घेतले जातात. दरवर्षी दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही शाळेने यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. अडचणीच्या काळात कर्जाची उपलब्धता व आर्थिक मदत व्हावी म्हणून, बचतीच्या उद्देशाने निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांनी सहकारी पतसंस्थेचीही स्थापना केली आहे.

आदर्श विद्यार्थी पुरस्कार...
शाळेतर्फे दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले जातात. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रात डॉक्टर, अभियंता, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, शासकीय अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक आदी पदांवर कार्यरत असून काहींनी राजकारण, समाजकारण, उद्योग, शेती व व्यवसायातही लक्षणीय प्रगती केली आहे. विद्यमान मुख्याध्यापक जयंत भामरे व उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी सद्या सहकाऱ्यांसह शाळेची यशस्वी धुरा सांभाळत आहेत. संस्थेने 80-जी अंतर्गत नोंदणी केली असून देणगीदारांना देणगीच्या रकमेत नियमानुसार करसवलत मिळते. म्हणून संस्थेचे सचिव नितीन शाह यांनी दात्यांना आर्थिक मदतीचेही आवाहन केले आहे..

"माळमाथा परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून आगामी काळात संस्थेचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात 'आयटीआय' सुरू करण्याचा मानस आहे."
- ऍड.शरदचंद्र जगन्नाथ शाह, अध्यक्ष, आदर्श कला महाविद्यालय, निजामपूर-जैताणे ता.साक्री जि.धुळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com