संस्कारक्षम शिक्षण देणारी 'भानुबेन वाणी पब्लिक स्कूल.!'

school
school

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन वाणी शिशु संस्कार केंद्र, भानुबेन वाणी पब्लिक स्कुल व श्रीमती आशुमतीबेन शाह विद्यालय ह्या तालुक्यातील इंग्रजी, सेमी-इंग्रजी व मराठी माध्यमातून संस्कारक्षम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार असे पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या नामांकित शाळा असून संस्थेने सन 1992 मध्ये 'भानुबेन वाणी शिशु संस्कार केंद्र' नावाने लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज भव्य अशा विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रमोदचंद्र शाह, उपाध्यक्ष बाबूलाल वाणी, सचिव लक्ष्मीकांत शाह, संचालक दुल्लभ माळी, मोहन सूर्यवंशी, भिकनलाल जयस्वाल, सुमंतकुमार शाह, राजेंद्र राणे, वासुदेव बदामे आदींसह मार्गदर्शक प्राचार्य मदनमोहन शिंदे, मुख्याध्यापकद्वय मनोज भागवत, आनंद सोनवणे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी खऱ्या अर्थाने या वटवृक्षाची जोपासना करत आहेत.

सातशे विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन...
संस्थेत आजमितीला सातशे विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत असून भानुबेन शिशु संस्कार केंद्रात (इंग्रजी माध्यम) 154 विद्यार्थी, (मराठी माध्यम) 108 विद्यार्थी, भानुबेन वाणी पब्लिक स्कुल (इंग्रजी माध्यम) 288 विद्यार्थी, तर आशुमतीबेन शाह विद्यालयात (मराठी माध्यम) 149 विद्यार्थी असे एकूण सुमारे 700 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. संस्थेने सन 2009 पासून श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कुल नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. त्यात सद्या इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या वर्गांचा समावेश असून ह्यावर्षापासून "सीबीएसई पॅटर्न" लागू करण्यात आला आहे. त्यानंतर संस्थेने सन 2013 पासून श्रीमती आशुमतीबेन शाह विद्यालय नावाची मराठी माध्यमाची शाळा सुरू केली. तीत सद्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांचा समावेश असून ह्यावर्षापासून सेमी-इंग्रजी माध्यमाचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. प्रतीक्षा आहे ती फक्त शासकीय अनुदानाची.

म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट व महिला पतसंस्थेचे सहकार्य...
संस्थेसह शाळांना नेहमीच म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्ट व म्हसाई माता महिला पतसंस्थेचे अनमोल सहकार्य लाभते. म्हसाई माता चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने ह्यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय इंग्रजी वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. म्हसाई माता महिला पतसंस्थेच्या सहकार्याने दरवर्षी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी, मोफत औषध वाटप आदी उपक्रम राबविले जातात. यासाठी म्हसाई ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, म्हसाई माता महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा उर्मिलाबेन शाह व संस्थेचे अध्यक्ष प्रमोदचंद्र शाह यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभते.

स्नेहसंमेलनासह विविध कला, क्रीडा महोत्सवांचे आयोजन...
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. त्यात स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव, वसुंधरा दिन, ज्येष्ठ नागरिक दिन, ओझोन दिन, दहीहंडी, फॅन्सी ड्रेस, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा आदी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात.

जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही दरवर्षी शाळेचे विद्यार्थी घवघवीत यश मिळवतात. 'स्केटिंग' क्रीडा प्रकारातही सलग दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सेकंडरी इंग्लिश टीचर्स असोसिएशनतर्फे आयोजित वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा दरवर्षी उदंड प्रतिसाद मिळतो.

विशेष पायाभूत सुविधांची निर्मिती...
शाळेत तीन डिजिटल क्लासरूम, संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मुख्याध्यापक कॅबिन, शिक्षक दालन व कार्यालय आदींसह सर्व क्लासरूम ए.सी.आहेत. विद्यार्थ्यांसाठी वॉटर फिल्टरच्या शुद्ध पाण्याची व आधुनिक पद्धतीच्या स्वच्छतागृहांचीही सोय केली आहे.

शालेय परिसरासह सर्व वर्गखोल्या ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहेत. विद्यार्थ्यांसाठी स्कुल बसची सुविधाही उपलब्ध असून माळमाथा परिसरातील खेड्या-पाड्यांसह थेट साक्रीहून मुले निजामपूरला शिकायला येतात हे विशेष. शाळेत सुमारे 40 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून शाळा सकाळ, दुपार अशा दोन सत्रात भरते. सद्या शाळेच्या तीन एकर परिसरात 12 वर्गखोल्या उपलब्ध असून शालेय इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. आजपर्यंत शाळेला अनेक लोकप्रतिनिधी व नामवंत व्यक्तींनी सदिच्छा भेटी दिल्या आहेत.

"ग्रामीण व आदिवासी भागातील गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांना माफक दरात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हे आमच्या संस्थेचे स्वप्न आहे."
- लक्ष्मीकांत विरेंद्रलाल शाह, सचिव, निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान.

"कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान नसताना विद्यार्थीहित, कर्मचारीहित व समाजहित जोपासणारी आमची शिक्षण संस्था ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे."
- मनोज बापू भागवत, मुख्याध्यापक, भानुबेन वाणी पब्लिक स्कुल, निजामपूर-जैताणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com