esakal | वृद्ध दाम्‍पत्‍याने उचलले हे पाऊल; जिल्‍हाधिकारी कार्यालयात गेले अन्‌
sakal

बोलून बातमी शोधा

dhule collector office

पोलिसांनी वृद्ध दाम्‍पत्‍याला ताब्‍यात घेतले. कीटकनाशक प्राशनातून वृद्ध दाम्‍पत्‍याने जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्‍न केला. सडगाव येथील जयराम पाटील (वय ६५) आणि चंद्रकला पाटील असे यसा दाम्‍पत्याचे नाव आहे.

वृद्ध दाम्‍पत्‍याने उचलले हे पाऊल; जिल्‍हाधिकारी कार्यालयात गेले अन्‌

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : सडगाव (ता. धुळे) येथील मालकीच्‍या जागेवर १५ जजाांनी अतिक्रमण केले आहे. त्‍या जागेवर संबंधित अतिक्रमणधारक अवैध मद्य व्यवसाय करतात. या प्रकरणी वेळोवेळी तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. यामुळे त्रस्‍त सडगावच्या वृद्ध दाम्‍पत्‍याने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी वेळीच हस्‍तक्षेप केल्‍याने अनर्थ टळला.
पोलिसांनी वृद्ध दाम्‍पत्‍याला ताब्‍यात घेतले. कीटकनाशक प्राशनातून वृद्ध दाम्‍पत्‍याने जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्‍न केला. सडगाव येथील जयराम पाटील (वय ६५) आणि चंद्रकला पाटील असे यसा दाम्‍पत्याचे नाव आहे.

दाम्‍पत्‍याने मांडलेली कैफियत अशी
सडगाव येथे आमच्या घराच्या मागील बाजूस निवासी घरांसह पंधरा जणांनी अतिक्रमण केले आहे. संबंधितांनी आमच्या मालकीच्या जागेत अवैध मद्य व्यवसाय सुरू केला आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्‍या. मात्र कुणीही दखल घेतली नाही. तसेच कारवाई न करता न्याय दिला नाही. या प्रकरणी न्यायालयातही धाव घेतली. त्‍यात संबंधीत अतिक्रमणधारकांना समन्स निघाले. त्‍यावर पोलियांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. अतिक्रमण धारकांनी आमच्याविरूद्ध बोगस फिर्याद दाखल केली. तक्रारी केल्‍याच्या रागातून धमकी देणे, अंगावर धावून येणे असे कृत्‍य केले. याबाबत तक्रारी करूनही कुणीही संरक्षण दिले की न्याय दिला नाही. यामुळे आत्‍मदहनाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

loading image