लग्‍न सोहळे गेले, गणेशोत्‍सवही गेला आता नवरात्रोत्‍सवार मदार

Pavilion Decorators
Pavilion Decorators

तऱ्हाडी (धुळे) ः कोविड १९ चे रुग्ण दिवसे- दिवस वाढत आसुन कोरोना काय थांबायचे नाव घेईना. यामुळे सर्वसामान्यासह उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत. त्यातच गणेशोत्सव आला; पण लग्‍नसराईमध्ये बुडालेल्‍या धंदा काही प्रमाणात गणेशोत्‍सवात होईल; याची आशा मंडप डेकोरेटरला होती. पण ती देखील मावळली असून आता आता पुढे येणाऱ्या नवरात्रोत्‍सवार मदार असणार आहे.

गणेशोत्सव आला म्हटले की मंडळाची लगबग असायची. मात्र यंदा कोरोनामुळे एक देखील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही. गणेशोत्सव म्हटले कि आधीपासूनच काही दिवस मंडप, डेकोरेशन, रंगीबेंरगी विद्युत रोषनाईसाठी आधीपासूनच बुंकीग असायची. मात्र गणेशोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजारा झाल्याने मंडप डेकोरोशनला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अजुन किती दिवस कोरोनामुळे मंडप डेकोशनवर गदा येणार; हे सध्या तरी कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे पुढे येणाऱ्या नवरात्रीवरच आता या व्यवासायीकांची आशा अवलंबुन राहिली आहे. तसेच मंडप व्यावसायीक बरोबरच डिजे, इलेक्ट्रिशियन, वाहतुक करणारे वाहन यासारख्या अनेकांचा रोजगार गेला आहे.

मंडप डेकोरेशन बंदमुळे गेला अनेकांचा रोजगार
सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनपासुन एकही मंडप डेकोरेशनची सुपारी आलेली नाही. गणेशोत्सवात तरी सुपारी मिळेल आशी आशा होती; पण प्रशासनाने घातलेलेल्या निर्बंधामुळे गणेशोत्सवावरही पाणी फेरले. सप्ताह सुद्धा बंद आसल्यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे. व्यवसाय पार अडचणीत सापडला आहे. तसेच आनेकांचा रोजगारही गेला आहे. यासदर्भांत शासनाने मंडप व्यवसायकाना आर्थिक मदत करावी 

रोगाच्या प्रादुर्भावामुळे व्यवसायाला पुर्णतः खीळ बसली असल्या कारणाने या व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या मालकावर कर्जबाजारीपणा ची वेळ आली असून यांचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडले आहे. पर्यायाने शासनाने यांच्यासाठी ठोस निर्णयाची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
- अनिल धनगर, मंडप डेकोरेशन व्यवसायीक.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com