esakal | सात हजारांवर शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट शून्यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

kapdane phc

जिल्ह्यात एकूण ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व दोनशेवर उपकेंद्रे आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी सर्व सुविधांनीयुक्त ऑपरेशन थिएटर आहेत.

सात हजारांवर शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट शून्यावर 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा साडेसहा महिन्यांपासून सर्वच घटकांना फटका बसला आहे. कोरोनामुळे लॉकडाउनचा फटका राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमालाही बसला आहे. साडेसहा महिन्यांपासून कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद आहेत. धुळे शहरासह जिल्ह्याचे वार्षिक सात हजारांवर शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे, ते अद्याप शून्यावरच आहे. 
जिल्ह्यात एकूण ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व दोनशेवर उपकेंद्रे आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी सर्व सुविधांनीयुक्त ऑपरेशन थिएटर आहेत. या सर्व केंद्रांवरील शस्त्रक्रिया बंद आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक शस्त्रक्रियाधारकाचा स्वॅब घेणे शक्य नाही. धोका पत्करण्यापेक्षा जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवरील ऑपरेशन थिएटर अद्याप लॉकडाउन आहेत. 

जिल्ह्यात जन्मदर वाढतोय? 
जिल्ह्यात मुलींचे जन्माचे प्रमाण हजार मुलांमागे ९२० आहे, तर धुळे तालुक्यात ९१३ आहे. मुलींच्या जन्मदराचे प्रमाण समाधानकारक आहे, पण गेल्या साडेसहा महिन्यांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बंद आहेत. आगामी कालावधीत शस्त्रक्रिया सुरू झाल्यास जन्मदराचे प्रमाण वाढेल, असे एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले. दरम्यान, जिल्हास्तरावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. लवकरच ऑपरेशन थिएटर अनलॉक होणार आहेत. 
 
धुळे तालुक्यात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची सद्यःस्थिती 
कुटुंब कल्याणचा प्रकार...वार्षिक उद्दिष्ट...सहामाही काम..टक्केवारी 
शस्त्रक्रिया...२१८२... ००.... ० टक्के 
दोन अपत्यांवर शस्त्रक्रिया... १९२०...००... ० टक्के 
तांबी….. १८२०.... ४८२... २६.४८ टक्के 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image