गाडीतून नेले जात होते मांस...गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घेतले ताब्‍यात

omni car trancport Meat
omni car trancport Meat

पिंपळनेर : मारूती ओमनी गाडीतून गोवंश जातीचे मांस चोरून लपून जाणारी गाडी पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. या गाडीत तब्‍बल ८० किलोचे साधारण ६१ हजार २०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

पिंपळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना गुप्त माहिती मिळाली होती. नवापूरकडून पिंपळनेरकडे येणाऱ्या मारुती ओमनी गाडीमध्ये गोवंश जातीचे जनावराचे मास येत असल्याची खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून सदर गाडी ताब्यात घेऊन 80 किलो मास व गाडी असे 61200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीविरोधात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला.

पिंपळनेर पोलीसांना गुप्त माहितीद्वारे नवापूरकडून पिंपळनेरकडे गोवंश जातीचे मासाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व त्यांचे कर्मचारी पोलीस नाईक निलेश महाजन पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांना सोबत घेऊन नवापूर रस्त्याला कुडाशी गावाजवळ नवापूरकडून येणारी मारुती ओमनी गाडी पोलिसांनी थांबवली. त्यात प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जनावरांचे मांस आढळून आले; घटनेचा पंचनामा करून मारुती ओमनी (जिजे 05 ए. जी. 955) ही गाडी ताब्यात घेऊन पिंपळनेर पोलीस स्टेशनला आणली. सदर गाडीचा चालक जुबेर रहमान कुरेशी राहणार इस्लामपुरा नवापूर यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 80 किलो वजनाचे जनावरांचे मास अंदाजे किंमत 11 हजार 200 गाडीची किंमत 50 हजार रुपये असे एकूण 61 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. 

मांसाचे नमुने तपासणीसाठी
दरम्‍यान पशुवैद्यकीय अधिकारी पिंपळनेर यांना पाचारण करून मासाची तपासणी करण्याची सांगण्यात आले. यावेळी दोन वेगवेगळ्या बॉटलमध्ये सॅम्पल घेऊन पुढील तपासणीसाठी हे मास पाठवण्यात आले. तर उर्वरीत मासाची विल्हेवाट लावण्यात आली. आरोपी जुबेर कुरेशी याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल पावरा असून पुढील तपास खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com