पात्र लाभार्थ्यांना मिळणार पाच किलो तांदूळ

rice
rice

धुळे : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत केंद्र सरकारने पात्र लाभार्थ्यांना पाच किलो मोफत तांदूळ उपलब्ध करून दिल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून 2020 करिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत दिलेल्या अन्नधान्याचे त्या- त्या महिन्यात वितरण होईल. एप्रिल 2020 साठी मोफत तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगमकडून प्राप्त करून घेतले जात आहे. 12 एप्रिलनंतर स्वस्त धान्य दुकानदारांतून वितरणास सुरवात होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थांतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अन्न धान्याचे वितरण होणार आहे. त्यात एप्रिल 2020 मध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना नियमित नियतन वाटप होईल. ई-पॉस मशीनवर एप्रिलसाठी वितरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत दिलेल्या तांदळाचे (प्रतिव्यक्ती पाच किलो) लाभार्थ्यांना ई-पॉसद्वारे मोफत वितरण करण्यात येईल. या तांदळाचे वाटप करताना लाभार्थ्यांनी त्या महिन्यासाठी नियमित अन्नधान्याची उचल केल्याची खातरजमा केली जाईल. 
अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांनाही प्रतिसदस्य दरमहा पाच किलो या प्रमाणात मोफत तांदूळ वितरित करण्यात येईल. (अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या नियमित 35 किलो अन्नधान्याचे वितरण केल्यानंतर अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेवर एक सदस्य असल्यास पाच किलो आणि दोन सदस्य असल्यास 10 किलो याप्रमाणे तांदळाचे वितरण करण्यात येईल.) प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनादेखील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या पाच किलो प्रतिसदस्य या परिमाणात अन्नधान्याचे वितरणानंतर प्रतिसदस्य पाच किलो तांदळाचे वितरण करण्यात येईल. मोफत अतिरिक्त तांदळाचे वितरण ई-पॉसद्वारेच होईल, अशी माहिती श्री. मिसाळ यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com