अवैध व्यवसायाला पोलिसांचा सॉफ्ट कॉर्नर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

धुळे  : जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असून पोलिस प्रशासनाकडून त्याबाबत मिळणारा सॉफ्ट कॉर्नर असल्याने कारवाई होत नाही. पोलिस प्रशासनाकडून या अवैध व्यवसायाला खतपाणी मिळते. त्यामुळे जिल्ह्याची स्थिती गंभीर झाली आहे. अवैध व्यवसायावर पोलिसांनी वर्षभरात साडेतेराशे गुन्हे दाखल करण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बोलबाला दिसून येत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यातील चारही तालुक्‍यात सट्टा, मटका, जुगारासह अवैध दारू विक्री सुरू आहे. शहरातील कानाकोपऱ्यात सट्टा व मटका व्यवसाय करणाऱ्यांची कमाई नोकरदारांपेक्षा अधिक असते. त्यामुळे कमी कालावधीत अवैध व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपयांची माया गोळा होते. तसेच या व्यवसायावर पोलिस प्रशासनाची मेहेरनजर असल्याने गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीही होत नाही. त्यामुळे या व्यवसायाचे फावते. 
मात्र या अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे. तर काहींचे संसाराची राखरांगोळी झाली आहे. एवढे होऊनही पोलिस प्रशासनाकडून अशा धंद्यांवर ठोस कारवाई केली जात नाही, हे विशेष जिल्ह्यातील सीमावर्ती भागात बनावट दारूचा व्यवसायामुळे पूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. पोलिसांकडून अवैध व्यवसायाला मिळणारा सॉफ्ट कॉर्नर म्हणजे एकप्रकारे मदतच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

अवैध व्यवसायाचा बोलबाला 
जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने अवैध व्यवसाय चालकांशी स्नेहपूर्ण व अर्थपूर्ण संबंध ठेवले आहे. पोलिसांनी गेल्या दहा महिन्यात जुगाराचे सहाशेहून अधिक, दारूबंदी 766 गुन्हे नोंदवले. आकडेवारीवरून पोलिस प्रशासनाने कागदी घोडे नाचविलेले दिसतात. मात्र खऱ्या अर्थाने अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहेत. सद्यःस्थितीत अवैध व्यवसायाचा बोलबाला दिसून येतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule police soft corner