विमा प्रतिनिधींच्या मागण्या संसदेत मांडणार : खासदार डॉ. भामरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

धुळे ः आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहोत. त्यात विमा क्षेत्रातही चांगली प्रगती केली आहे. घराघरापर्यंत विमा पोहोचण्याचे काम प्रतिनिधी करतात. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात विमा प्रतिनिधींच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ. गरज पडल्यास त्यांच्याबरोबर हे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनातही सहभागी होऊ, असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री व नवनिर्वाचित खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिले. 

लाइफ इन्शुरन्स एजंट्‌स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पारोळा रोडवरील राम पॅलेसमध्ये आज वेस्टर्न झोन आणि नाशिक विभागीय विमा प्रतिनिधींचा महामेळावा झाला. खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. फेडरेशनचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नयनकमलजी, माजी अध्यक्ष के. के. वर्मा, ऑल इंडिया सेक्रेटरी जनरल कुलदीप बोन्ल्या, झोनल प्रेसिडेंट सुधीर पाध्ये, नाशिक डिव्हिजन प्रेसिडेंट कैलास चव्हाण, प्रतिपादसिंह वालेचा, राकेश चव्हाण, डी. बी. रॉय, हर्ष नारायण यादव, अवलेशकुमारसिंग, सुरेश शेळके, शैलेश परमार, कविराज विक्रमसिंग, नरेंद्र बीडकर, पी. एन. मुंदडा यांच्यासह देशभरातून आलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की धुळे जिल्ह्यातही विविध प्रकारचा विकास होत आहे. त्यात विम्यातही प्रगती केली आहे. घराघरांत विमा पोहोचलेला आहे. त्यामागे विमा प्रतिनिधींचे कष्ट आहेत. त्यामुळे विमा प्रतिनिधींचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण एलआयसीच्या चेअरमनसह संसदेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांचे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. 
के. के. वर्मा, नयनकमलजी, पी. एन. मुंदडा, किरण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. महामेळाव्यासाठी नाशिक विभागातून दीड हजारापेक्षा अधिक, तर देशाच्या अन्य भागातून फेडरेशनच्या विविध शाखांचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी असे दोन हजार विमा प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते. 

आंदोलनासाठी तयार राहावे 
दिवसभर झालेल्या महामेळाव्यात फेडरेशनच्या विविध राज्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून विमा प्रतिनिधींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. त्यात त्यांना कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी, 
त्यांना योग्य ते आरोग्यसेवेसाठी मेडिक्‍लेम पॉलिसी लागू करावी, त्यांच्यासाठी पेन्शन योजना सुरू करावी आदी विविध मुद्यांवर वेगवेगळ्या सत्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यासंदर्भात गरज पडल्यास सर्वांना संघटितपणे आंदोलनासाठी तयार राहावे, असाही सल्ला देण्यात आला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule policy agent dr bhamre