विविध कारणांसह "प्रोजेक्‍ट'च्या नावाखाली खरेदी 

drugs
drugs

धुळे : शैक्षणिक "प्रोजेक्‍ट'सह विविध कारणे दाखव शालेय, महाविद्यालय परिसर, वर्दळीच्या मार्गावरील निरनिराळ्या दुकानातून नशेच्या पदार्थ, वस्तूंची खरेदी नशेबाज करतात. एखाद्या चाणाक्ष व्यावसायिकाला ते लक्षात येण्यापूर्वीच नशेबाज अधिक प्रमाणात नशेचे पदार्थ, वस्तूंची खरेदी करतात आणि ती इतर नशेबाज सहकाऱ्यांना पुरवत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. असे व्यावसायिक, शालेय, महाविद्यालय परिसराला ही धोक्‍याची घंटा असून पैसा महत्त्वाचा की पिढीचे भविष्य हे ज्याने- त्याने ठरवायचे आहे. 

खरेदी व विक्रीचे रॅकेट 
विशेष म्हणजे एखाद्या चाणाक्ष, जागरूक दुकानदाराला सारख्या- सारख्या त्याच वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या तरुणांची संख्या किंवा त्यांनी पाठविलेल्या लहान मुलांविषयी साशंकता वाटू लागल्यानंतर त्यांना संबंधित दुकानदार खटकवल्याशिवाय राहात नाही. त्यावेळी संबंधित मुले, तरुण गोडीगुलाबीने त्या वस्तू अधिक प्रमाणात खरेदीवर भर ठेवतात आणि नंतर त्या नशेबाज सहकाऱ्यांना विक्री करतात. यातही रॅकेट सक्रिय आहे. असंख्य खरेदीदार, त्यात "त्या' व्यावसायिकाची चांदी होत असली तरी धुळे शहराचे भवितव्य मात्र अंधारात लोटले जाते. त्याची कुठलीही तमा न बाळगता नशेखोरीत धुळे शहरातील असंख्य मुले, तरुण गुरफटत चालले आहे. 

जाणीवजागृती होईल केव्हा? 
शाळा, महाविद्यालयांसह वर्दळीच्या मार्गावरील निरनिराळ्या दुकानात नशेच्या वस्तू, पदार्थ सहज उपलब्ध होतात. तसेच काही वस्तू, पदार्थ चोऱ्यामाऱ्यातून मिळविल्या जातात. तसे प्रकारही समोर येत आहेत. शहरात चौफेर अल्पविकसित भागात, मुस्लिमबहुल भाग, देवपूरपर्यंत नशेखोरीचे मोठे लोण पोहोचले आहे. यात नशेबाज मुले, तरुण स्वस्तातील आणि सहज उपलब्ध होणारे स्टीक फास्ट, व्हायटनर व थिनर, फेव्ही बॉण्ड- एसआर, रिफीलमधील शाई, पेट्रोल, फर्निचरची पॉलिश (वॉर्निश), पंक्‍चर काढण्याचे सोल्यूशन, फ्रेंच पॉलिशचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. दहा ते वीस रुपयांतील नशा त्यांचे जीवन व शहराचे भवितव्य उद्‌ध्वस्त करत आहे. त्याविषयी नेते, अधिकाऱ्यांना केव्हा जाणीवजागृती होईल? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com