राईनपाड्यातील हत्यांकाड : दोन जण पोलिस कोठडीत 25 न्यायालयीन कोठडीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

साक्री ः खवे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या पाच भिक्षुकांच्या राईनपाडा (ता. साक्री) येथे एक जुलैला झालेल्या क्रूर हत्याकांड प्रकरणी मुख्य दोन आरोपींना 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, तर उर्वरित 25 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्याकडून चौकशीत घटनेमागच्या कारणाचा उलगडा केला जात आहे. 
 
न्यायालयीन कोठडीतील 25 आरोपींची धुळेस्थित जिल्हा कारागृहात रवानगी झाली आहे. उर्वरित दोघे साक्री पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहेत. समाजमन सुन्न करणाऱ्या या अमानुष हत्यांकाडातील रविवारी अटक झालेले मुख्य आरोपी दशरथ पिंपळसे व गुलाब पाडवी यांना 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत प्रमुख 12 जणांनी निर्दयीपणे पाच भिक्षुकांची ठेचून हत्या केली आहे. त्यातील चौघे गजाआड झाले आहेत. घटनेच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्‍लिप, फोटोंच्या आधारे उर्वरित आठ जणांच्या मागावर पोलिस आहेत.

Web Title: marathi news dhule rainpada murder case 2 pc