नदीच्या बंधाऱ्यावर आढळला शेतकऱ्याचा मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

कापडणे : अंबोडे (ता. धुळे) येथील युवा शेतकरी भरत रमेश शिदगोर (वय 40) यांचा मृतदेह कन्हेरी नदीवरील बंधाऱ्याच्या काठावर आज (ता.26) सकाळी सातच्या सुमारास ग्रामस्थांना आढळून आला. सोमवारी (ता.25) कन्हेरी नदीला आलेल्या पूरात शिदगोर वाहून गेले होते. त्यांची शोध मोहीम सुरु असताना आज सकाळी मृतदेह नदीच्या काठावर आढळून आला. शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अंबोडे, मुकटी, अजंग शिवारात रविवारी रात्री दोन तास मुसळधार पाऊस झाला होता. मुसळधार पावसाने कन्हेरी नदीला पूर आला. कामावरुन परत येत असताना भरत रमेश शिदगोर वाहून गेल्याचा अंदाज होता. ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरु केली होती. जेसीबीने बंधाऱ्यातील झाडे झुडुपे व गाळ बाजूला करीत चोविस तासांपासून शोध सुरु असल्याचे संदीप थोरात यांनी सांगितले. भरत शिदगोर हे मुळचे पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथील रहिवाशी आहेत. येथे शेती कामधंद्यानिमित्त रहिवास होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी ज्योती शिदगोर व एक मुलगी व एक मुलगा आहे. दरम्यान 24 जानेवारीला कन्हेरीला आलेल्या पुराचे पाणी अंबोडेत शिरले होते. 

Web Title: marathi news dhule river farmer daith