धुळे शिवसेना महानगरप्रमुखासह माजी नगरसेवकास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

अमळनेर - धुळे येथील महामार्गावरील उड्डाण पुलात  भूसंपादीत झालेल्या जमिनीचा वाढीव मोबदलाच्या आर्थिक अपहार प्रकरणी धुळ्यातील  शिवसेना महानगर प्रमुख सतीश  महाले, माजी नगरसेवक विनायक शिंदे, विनोद महाले, धुडकू मोरे चार जणांवर रात्री साडे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लागलीच सतीश महाले व विनायक शिंदे यांना अटक करण्यात आली.

अमळनेर - धुळे येथील महामार्गावरील उड्डाण पुलात  भूसंपादीत झालेल्या जमिनीचा वाढीव मोबदलाच्या आर्थिक अपहार प्रकरणी धुळ्यातील  शिवसेना महानगर प्रमुख सतीश  महाले, माजी नगरसेवक विनायक शिंदे, विनोद महाले, धुडकू मोरे चार जणांवर रात्री साडे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लागलीच सतीश महाले व विनायक शिंदे यांना अटक करण्यात आली.

अमळनेर पोलिसांनी काल तबल सात तास कसून चौकशी करून सोडून दिले होते मात्र काही तासातच वरिष्ठ पातळीवरून  चक्रे फिरल्याने संशयितांना पुन्हा रात्रीच पोलीस ठाण्यात हजर  होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार संशयित दाखल झाले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पहाटेपर्यंत सखोल चौकशी करून संबंधितांवर आर्थिक फसवणूक, अपहरण, खंडणी, अट्रोसिटी अशा कलमांन्वये  गुन्हे दाखल करण्यात आला. त्यानंतर लागलीच सतीश महाले व विनायक शिंदे यांची पहाटे वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आली. यावेळी बँकेचे अधिकारी देखील चौकशीसाठी बोलावले गेले जिल्हा आर्थिक गुन्हे शाखा पथक यांनी देखील त्यांची कसून चौकशी केली. दिनेश ठाकरे यांच्या वडिलांची जमीन महामार्गावर उड्डाण पुलात  संपादित झाली होती तत्पूर्वी विकास ठाकरे यांनी ही जमीन धुडकू मोरे यांना विकली होती.  त्यावेळी त्यांना 26 लाख रुपये मिळाले होते. त्या दरम्यान विकास ठाकरे यांचा मृत्यू झाला.  जमीन मात्र विकास ठाकरे यांच्या नावावरून वारसदार दिनेश ठाकरे यांच्या नावावरच राहिली होती. शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रकल्पात  संपादित जमिनीचा वाढीव मोबदला मिळणार असल्याचे कळताच धुळे येथील वरील संशयित आरोपींनी सदर दिनेश ठाकरे याच्याशी संपर्क केला व त्याला गाठून करार केला  पॉवर ऑफ अटर्नि म्हणून  मोबदला मिळवून देण्याचे अमिष दाखवले.  सदर मोबदला प्राप्त झाल्यानंतर धुळे येथील एका खासगी बँकेत रक्कम जमा झाली होती. मात्र ती एकरकमी रक्कम वाटत  नसल्याने ती अमळनेर येथील नवीन एच डी एफ सी बँकेत वर्ग केली.  ते बुधवारी बँकेत आले असतांना तेव्हा पोलिसांच्या हाती लागले. 
दरम्यान याबाबत आमदार अनिल गोटे हे राष्ट्रीय महामार्गातील भूसंपदीत जागेतील आर्थिक व्यवहारात अपहार प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहे. त्यामुळे या घटनेला राजकीय वळण मिळणार आहे.

Web Title: marathi news dhule shivsena bhusampadan arest

फोटो गॅलरी