esakal | बहुचर्चित सोनियाने उडविली शंभर तरूणांची झोप; करायची ब्‍लॅकमेलिंग
sakal

बोलून बातमी शोधा

facebook friend request

फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून तरूणाने फसवणूक केल्‍याचे प्रकार उघडकीस आले आहेत. धुळ्यात मात्र ‘सोनिया’ नावाची फ्रेंडरिक्‍वेस्‍ट आल्‍यानंतर तरूणांची फसवणूक झाली. यात एक, दोन नव्हे तर तब्‍बल शंभर तरूणांना फसवत गंडविले आहे.

बहुचर्चित सोनियाने उडविली शंभर तरूणांची झोप; करायची ब्‍लॅकमेलिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणांना जाळ्यात ओढायचे, त्यांच्याशी अश्‍लील कृत्य करत व्हीडीओ रेकॉर्डिंग करायचे आणि नंतर ब्लॅकमेल करत पैसे उकळायचे, असा गैरउद्योग करणाऱ्या बहुचर्चित सोनियाविरुद्ध येथील पोलिसांकडे तक्रार झाली आहे. वादग्रस्त सोनियामुळे येथील शंभरावर तरुणांची झोप उडाली आहे. 
सोशल मिडीयाचा वापर अनेकजण नक्‍कीच चांगल्‍या प्रकारे करत असतात. तर काही जण त्‍याचा गैरउपयोग करत फसवणूकीचे काम करत असतात. यामध्ये बऱ्याच तक्रारी या तरूणींच्या असतात. फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून तरूणाने फसवणूक केल्‍याचे प्रकार उघडकीस आले आहेत. धुळ्यात मात्र ‘सोनिया’ नावाची फ्रेंडरिक्‍वेस्‍ट आल्‍यानंतर तरूणांची फसवणूक झाली. यात एक, दोन नव्हे तर तब्‍बल शंभर तरूणांना फसवत गंडविले आहे.

स्‍वतःच पाठवायची फ्रेंड रिक्‍वेस्‍ट
सोनिया या नावावरून फेसबुकवर रिक्‍वेस्‍ट यायची. ती ॲक्‍सेप्ट झाल्‍यानंतर सोनियाच्या खेळाला सुरवात व्हायची. या प्रकरणी एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पोलिसांना तक्रार दिली आहे. फेसबुकवर नऊ ऑक्टोबरला सोनिया गुप्ता (मुंबई) या नावाने तक्रारदाराला फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती स्वीकारली. दुसऱ्या दिवसापासून सोनियाच्या अकाऊंटवरून सातत्याने मेसेज सुरू झाले. काही दिवसांत दुपारी साडेतीन ते चारच्या वेळेत तक्रारदाराला सोनियाच्या अकाऊंटवरुन व्हिडीओ कॉल आला. त्याने तो रिसीव्ह केला. 

तर क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी
रात्री तक्रारदाराला धमकीचा मेसेज आला. तुला पाठविलेली क्लीप पहा, मला ब्लॉक केले, तर ही क्लीप शहरात व्हायरल करेल. तसे घडू द्यायचे नसेल, तर ५० हजार रुपये सांगितलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठव, असा मेसेज दिला. त्या क्लीपमध्ये तक्रारदाराचा चेहरा एडीट करून एका मुलीशी अश्लील कृत्य करीत असल्याचे दृश्‍य होते. वादग्रस्त सोनियाने पाठविलेली क्लीप शहरात काही तरुणांकडून व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. 

loading image