esakal | मृत ऊसतोड मजुरास साडेचार लाखाची मदत 
sakal

बोलून बातमी शोधा

sugar worker

मनोहर पाटील या युवक ऊसतोड मजुराचा मृतदेह चंद्रभागा नदीत सापडला. याबाबतीत सकाळमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भटू पाटील यांनी तत्काळ आष्टी येथे धाव घेतली.

मृत ऊसतोड मजुरास साडेचार लाखाची मदत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कापडणे (धुळे) : येथील ऊसतोड मजूर मनोहर नवल पाटील याचा परिते (ता. माढा) येथील चंद्रभागेच्या उपनदीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. त्याचे मृतदेह तीन दिवसांनी सापडला. या ऊसतोड मजुराला तेथील आमदार सुरेश धस यांनी वैयक्तिक एक्कावन्न हजाराच्या मदतीसह तहसीलदाराकडील विशिष्ट निधीतून चार लाखाची तत्काळ मदत मिळवून दिली. 

मनोहर पाटील या युवक ऊसतोड मजुराचा मृतदेह चंद्रभागा नदीत सापडला. याबाबतीत सकाळमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भटू पाटील यांनी तत्काळ आष्टी येथे धाव घेतली. तेथील आमदार सुरेश धस यांच्याकडे मृत पाटील यांच्या कुटुंबाची आर्थिक व्यथा मांडली. आमदार धस यांनी तात्काळ वैयक्तिक एक्कावन्न हजाराची मदत मनीषा मनोहर पाटील यांच्याकडे सुपूर्त केली. तेथील तहसीलदाराकडे स्वतः पाठपुरावा करून तत्काळ चार लाखाची मदत मिळवून दिली. दरम्यान पाटील या मजुराच्या मृत्यूनंतर मदतीसाठी आमदार धस, गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर संघटनेचे राज्याध्यक्ष श्रीमंतराव जायभाये, उपाध्यक्ष राजन तिडके, जिल्हा परिषद सदस्य माऊली, गणेश शिंदे हे धावल्याने मोठी मदत झाली. जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनीही भेट घेत मदतीसाठी सरसावले आहेत.