esakal | धुळे तालुक्यात दोन हजारावर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ? 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे तालुक्यात दोन हजारावर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ? 

खरोखर शंभर टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत का हे सर्वज्ञात आहे. तरीही नमूद केलेल्या माहितीविषयी संतापजनक प्रतिक्रीया पालकांमधून व्यक्त होवू लागल्या आहेत. 

धुळे तालुक्यात दोन हजारावर विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ? 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लाॅक डाऊनमुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. 2020-21 या शैक्षणिक वर्षाचे शालेय कामकाज 'शाळा बंद शिक्षण सुरु उपक्रम' सुरु आहे. धुळे तालुक्यात 23 हजार 641 विद्यार्थ्यांपैकी 21हजार 472 विद्यार्थी विविध माध्यमातून शिक्षण घेत आहे. तर 2 हजार 149 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचे पुढे आले आहे. मात्र खरोखर एकवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत का, हा संशोधनाचा विषय असल्याचे पुढे आले आहे. 

आवश्य वाचा- कोरोनाच्या‘रिकव्हरी रेट’मध्ये धुळे जिल्हा अव्वल 

सात केंद्रात शंभर टक्के शिक्षण ? 
शाळा बंद शिक्षण सुरु उपक्रमात धुळे तालुक्यातील नरव्हाळ, कापडणे, बोरीस, कुसुंबा, खेडे, नेर व देऊर केंद्रातील एकूण 8 हजार 846 विद्यार्थी विविध सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिक्षण घेत असल्याचे पंचायत समितीच्या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. मात्र खरोखर शंभर टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत का हे सर्वज्ञात आहे. तरीही नमूद केलेल्या माहितीविषयी संतापजनक प्रतिक्रीया पालकांमधून व्यक्त होवू लागल्या आहेत. 

दिक्षा अॅप न वापरणारे शिक्षकही 
लळींग, बोरीस, शिरुड, वेल्हाणे, कुसूंबा आणि आर्वी या केंद्रांतील एकूण सव्वीस शिक्षक शासनाचे महत्वाकांक्षी शैक्षणिक दिक्षा अॅप वापरत नसल्याचे पंचायत समितीच्या मासिक अहवाल नमूद केले आहे. दरम्यान पंचायत समितीची मासिक बैठक ही व्हीडीओ कान्फरन्स द्वारे झाली. ती पंधरा वीस मिनिटात गुंडाळण्यात आली. अन्यथा आपण हा मुद्दा उपस्थित केला असता असे एका पंचायत समिती सदस्याने सांगितले. 

वाचा- नंदुरबार जिल्ह्यात २७३ कोटींचे पीककर्जवाटप 
 

विद्यार्थी अध्यापन करणारी माहिती दिशाभूल करणारीच ? 
सुमारे तेवीस हजारापैकी सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षणपासून वंचित असल्याची माहिती दिशाभूल करणारी आहे. दोन हजार विद्यार्थीच शिक्षण घेत अाहेत. ग्रामीण भागात लाॅक डाऊनमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. शैक्षणिक वातावरण असलेल्या घरातील विद्यार्थीही आॅनलाईन अभ्यासात रमत नसल्याची वस्तूस्थिती आहे. अश्या स्थितीत या अहवालाची चौकशी होणे आवश्यक आहे. 
एक पालक, कापडणे ता.धुळे  

संपादन- भूषण श्रीखंडे