शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचाच बुरूज ढासळतोय!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

धुळे ः शिक्षक संघटनांमधील गटातटाने संघटना ही त्या- त्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून टाकली आहे. त्यामुळे राज्य विधान परिषदेअंतर्गत नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक संघटना आहेच कुठे, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचाच बुरूज या निवडणुकीतून ढासळायला सुरवात झाल्याचे चित्र आहे. 
 
उमेदवार निवडीवरून शिक्षक संघटनांमध्ये निर्माण झालेला कलह हा राजकीय पक्षांना लाभाचा ठरला आहे. किंबहुना, शिक्षकांची ही निवडणूक यंदा राजकीय पक्षांनी "हायजॅक' केली आहे. त्यामुळे अनेक मतदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 
 
शिक्षकांमध्ये चिंता 
या निवडणुकीत रोज चालणाऱ्या जेवणावळीसह इतर खर्च पाहता तो गरीब, सामान्य शिक्षक उमेदवार कसा पेलू शकेल, असा प्रश्‍न संबंधितांना भेडसावत आहे. नेहमीच्याच राजकीय वळणावर शिक्षकांची निवडणूक चालल्याने अनेक मतदार चिंता व्यक्त करीत आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षकांबरोबर संघटनांचाही धीर सुटत चालला आहे. 
 
संघटना उरलीच कुठे? 
नगरचे उमेदवार भाऊसाहेब कचरे, अमृत शिंदे, धुळ्याचे उमेदवार प्रा. संदीप बेडसे, जळगावचे उमेदवार शालिग्राम भिरूड हे आम्ही "टीडीएफ'चे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगतात. त्याचवेळी भाजपपुरस्कृत उमेदवार अनिकेत पाटील, येवल्यातील शिवसेनापुरस्कृत उमेदवार किशोर दराडे, संघाच्या शिक्षक परिषदेतर्फे बंडखोरी करणारे सुनील पंडित हे आम्हाला "टीडीएफ'चा पाठिंबा असल्याचे सांगतात. मुळात शिक्षक उमेदवारवगळता प्रा. बेडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, श्री. पाटील हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस, तर आता भाजपचे, श्री. दराडे हे शिवसेनेचे, श्री. पंडित हे भाजपचाच एक अंग असलेल्या शिक्षक परिषदेचे पदाधिकारी असल्याने संघटना उरलीच कुठे, असा प्रश्‍न समोर येतो. संघटनांमधील गटातटाने त्या- त्या राजकीय पक्षाच्या दावणीला संघटना बांधून टाकल्याने राजकीय नेत्यांना सोयीची स्थिती झाली आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीवरील पकड घट्ट करण्यास सुरवात केली आहे. यात शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचाच बुरूज ढासळत असल्याचे चित्र समोर येते. 
दुसऱ्या पसंतीवर लक्ष 

उमेदवारांना विजयासाठी कोटा पूर्ण करावा लागतो. झालेल्या मतदानाच्या पन्नास टक्के आधिक एक या सूत्रानुसार ठरतो. शिक्षक मतदार संघासाठी आतापर्यत सरासरी 65 
टक्केच्या पुढे मागे मतदान झाले आहे. यावेळी 53335 मतदारांनी नोंदणी केली आहे. आतापर्यत शिक्षक मतदार संघासाठी 65 टक्केच्या सरासरीने मतदान झाले आहे. विजयी उमेदवारांचे मताधिक्‍य 10 हजाराच्या आसपास राहिले आहे. यापूर्वी तीन निवडणूकात शक्‍यतो, थेट लढती झाल्या यावेळची बहुरंगी लढतीचे चित्र आणि चूरस बघता 70 टक्के 37 हजाराच्या आसपास मतदान झाले तर पहिल्या फेरीत विजयासाठी 18 ते 19 हजाराच्या आसपास मतदान लागणार आहे. एकेका जिल्ह्याची ही सरासरी आहे. पहिल्या फेरीत एका जिल्ह्यातील मतदार संख्येएवढे मतदान उमेदवार मिळविणे सोप नाही. त्यामुळे मतविभागणीत लढतीचा निकाल दुसऱ्या फेरीवर जाण्याची शक्‍यता जास्त आहे. 

Web Title: marathi news dhule teacher election sanghtna