अवकाळी पावसामुळे गहू, हरबरा, मका कांदा, पिकासह भाजीपाला पिकांची नासाडी 

अवकाळी पावसामुळे गहू, हरबरा, मका कांदा, पिकासह भाजीपाला पिकांची नासाडी 

त-हाडी ः शिरपूर तालुक्यातील त-हाडीसह परिसरातील वरूळ, भटाणे, जवखेडा लोढरे ममाणे अभानपुर, त-हाडकसबे, अतुली, अवकाळी पाऊसाने आणि अनेक भागातील शेतात पाणी पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हाताशी आलेल्या रबी पिकांना जोरदार फटका बसला. भाजीपाला पीकही उद्ध्वस्त झाले. यात शेतकऱ्यांची लाखोंची हानी झाली आहे.

परिसरातील शेकडो हेक्टरमधील शेतपिकांची नासाडी झाली. यात गहू, हरभरा, मिरची, मका कांदे तुर व भाजीपाल्यांचा समावेश आहे. शेतीच्या नुकसानीने शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. शुक्रवारी अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले. तब्बल रात्रभर पाऊस सुरू झाल्याने शेतपीकाची नासाडी झाले. आदी गावातील हजारो हेक्टर शेतपिकाचे भयंकर नुकसान झाले. गहू, ज्वारी, कांदा, मका तुर, पीक जमीनीवर शेतातील पिकही क्षणार्धात डोळ्यादेखत अवकाळी पावसाने तडाख्याने नुकसान झाले.

हवामानाचा अंदाज अचानक बदलल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाची सावरासावर करण्याआधीच शेतात होत्याचे नव्हते झाले. अकाली आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढविण्याने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर ही नगदी पिके क्षणार्थात नुकसान झाली. शेतकऱ्यांनी उसनवारी करुन मोठ्या मेहनतीने पिकांची लागवड केली होती. हरभरा, ज्वारी, मका तुर कापणीला आली असताना अवकाळी पावसामुळे तडाख्याने नुकसान झाली. शेतात पिकांचा पार सडा पडला होता. नुकसान झालेला शेतमाल पुन्हा हातात येईल याची कोणतीच शक्यता नाही. एवढा निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे.

खरिपमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही नुकसानभरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यातच पुन्हा अवकाळी पावसाने झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे ताबडतोब कृषी विभाग व महसूल मंडळाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची नितांत गरज आहे.
- धनराज कंरके त-हाडी

यावर्षी शेवगा मोहोर मोठ्या प्रमाणात आला. ज्या काही शेवगाच्या बागांमध्ये मोहोर बहरला होता तोही या बेमोसमी व अवकाळी पावसामुळे गळून पडला आहे. यामुळे शेवग्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.
सजय जाधव
- शेवगा बागायतदार त-हाडी.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com