युवकाचा परित्यक्तेशी विवाह; मराठा पाटील समाजात बदलाची नांदी

जगन्नाथ पाटील
शनिवार, 24 मार्च 2018

कापडणे (धुळे)- मराठा पाटील समाजात उपवर मुलांचे विवाह जमणे कठीण झाले आहे. मुलांच्या प्रमाणात मुली कमी आहेत. पण नोकरी नसल्याने बेरोजगार व शेती कसणार्‍या मुलांना मुलगी द्यायला कोणी तयार नाही. येथील उदय अशोक पाटील या उपवर युवकाने थाळनेर (ता.शिरपूर) येथील परीतक्त्या मुलिशी विवाह करीत; मराठा पाटील समाजात एक आदर्श उभा केला आहे. या विवाहास राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. या धाडसी निर्णयामुळे इतर तरुणांनीही पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

येथील उदय पाटील हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने आधुनिक शेती करणारा हरहुन्नरी युवक आहे. तर थाळनेर येथील बी.एस्सी. झालेली परीतक्त्या जयश्री गोरख ठाकरे यांचा सोनगीर येथील सोमेश्वर मंदिरात पारंपारीक पध्दतींना फाटा देत विवाह झाला. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, सरपंच भटू पाटील, भाजपा कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, भय्या पाटील, विलास पाटील, पांडूरंग पाटील, शरद माळी, तनिष्का सदस्या इंदीरा पाटील, वृंदा पाटील, कविता पाटील, उपसरपंच कविता पाटील आदी उपस्थित होते. या विवाहाचे संयोजन थाळनेरचे जगदीश वसंत ठाकरे, नवल पाटील, गुलाब पाटील, प्रल्हाद पाटील यांनी केले.

उपवर मुलांसाठी विदर्भात वधू शोध
मराठा पाटील समाजात शेती कसणार्‍या युवकांना, शेतमजूरास, कंपनीत काम करणार्‍या नोकरदार व बेरोजगारांचे विवाह जमणे महाकठिण झाले आहे. विदर्भात मुलगी संशोधन सुरु झाले आहे. सरकारी नोकरदार मुलगा शोधण्यात उपवर मुलींच्या वयानेही तीशी पार केली आहे. तरुणांनी आता परीतक्त्या व विधवांशी विवाह करावा यासाठी येथील काही मंडळींनी पुढाकार घेतला आहे.

तरुणांनी करावे असे अनुकरण
पाटलांमधील बदलाची ही मोठी नांदीच आहे. आता उपवरांच्या मातापित्यांनी पुढाकार घ्यावा. उपवर तरुणांनी अनुकरण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news dhule weddings