"शौचालया'साठी अखेर "गोठा' भुईसपाट 

sakal impact
sakal impact

धुळे : शहरात पांझरा नदी काठावरील साईबाबा नगरमध्ये सार्वजनिक शौचालयाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने अखेर अतिक्रमित म्हशींचा गोठा आज भुईसपाट केला. त्यामुळे या जागेवर लवकरच शौचालय उभे राहील व शौचालयाअभावी या भागातील नागरिक, विशेषतः महिलांची कुचंबणा थांबणार आहे. 

अखेर जागा उपलब्ध 
दरम्यान, सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामासाठी अखेर महापालिकेने जागेचा शोध लावला आहे. साईबाबा नगरमध्ये एका ठिकाणी महापालिकेच्या जागेवर म्हशींचा गोठा बांधण्यात आला होता. हा गोळा आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केला. संबंधित गोठा बांधणाऱ्यांनी या कारवाईला थोडा विरोध केला खरा पण पथकाने विरोध मोडीत काढत शौचालयासाठी आवश्‍यक जागेवरील गोठ्याचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. शौचालयासाठी त्या भागातील नागरिक, नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने ही कारवाई केली. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रसाद जाधव व पथकाने ही कारवाई केली. 

शौचालयाचा प्रश्‍न मोकळा 
जागेअभावी सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करता येत नव्हते. आता महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्याने शौचालयाचा प्रश्‍न आता निकाली निघणार आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग शौचालय बांधून देणार आहे. 

"सकाळ'ने मांडला होता प्रश्‍न... 
दरम्यान, शौचालय नसल्याने साईबाबा नगर व परिसरातील नागरिकांना उघड्यावर जावे लागत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महिलांना जास्तच गैरसोय झाल्याने या भागात नदी किनारीच जाळी लावून आडोसा उभा केला गेला होता. हागणदारीमुक्त (ओडीएफ प्लस-प्लस) शहरातील ही वस्तुस्थिती "सकाळ'ने "लज्जास्पद..! शीर्षकाखाली मांडली. त्यानंतर शौचालयाच्या या प्रश्‍नावर महापालिकेची यंत्रणेने हालचाली गतिमान केल्या. प्रभागातील नगरसेवकांनीही महापालिकेकडे शौचालय बांधकामाची मागणी अधिक जोमाने लावून धरली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com