धुळे शहरातील महिलांनी स्मशानभूमीत रचली चिता

जगन्नाथ पाटील
मंगळवार, 9 जानेवारी 2018

धुळे - शहरातील काही महिला स्मशानात पोहचल्या. महिला स्मशानात का म्हणून आल्यात, हे बघण्यासाठी म्हणून काही पुरुष मंडळीही गोळा झालीत. त्या महिलांनी प्रवेशद्वाराजवळ पूजन केले. निरांजन ओवाळले. नारळ वाहिले. सरणासाठी लाकड गोळा केलीत. चिता रचली... अन् त्यानंतर स्मशानाची साफसफाईही केली. बघ्यांनी गर्दी केली होती. महिलांच्या या हिंमतीला दादही दिली.

शहरातील जिजाऊ ब्रिगेडतर्फे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंतीपर्यंत जन्मोत्सव सोहळा हा महिला सक्षमीकरण सोहळा म्हणून साजरा होत आहे. त्याअंतर्गत स्मशानभूमीला भेट व स्वच्छता मोहीम आणि अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रम राबविण्यात आला. त्यावेळी ताराराणी जेष्ठ नागरीक संघाच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुलभा कुवर, संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा ठाकरे, मीना पाटील, अॅड. पुष्पा भामरे, शोभा पाटील, अर्चना भदाणे, वसुमती पाटील, रेवती पाटील, हेमंत भडक, महेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी महिलांच्या मनातील स्मशानातील भितीही काढण्यात आली.

दरम्यान ब्रिगेडतर्फे आदिवासी वस्तीत महिला जागृती मेळावे होत आहेत. यात रेशनकार्ड, आधार कार्ड, घरकूल योजना आदींबाबत माहिती दिली जात आहे. शासनाच्या योजनांचा पूर्ण लाभ मिळत नसल्याची खंतही सुरेखा नांद्रे यांनी व्यक्त केली.

Web Title: marathi news dhule womens graveyard pyre