नोकरीवर हजर व्हायला गेला; अन्‌ तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला...कसा ते बघा? 

corona positive
corona positive

साक्री (जि. धुळे) : साक्री शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार झाली असून, शुक्रवारी एकाच दिवसात तीन जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्‍यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पैकी एक बाधित तरुण नाशिक रिटर्न असून तो नोकरीच्या ठिकाणी हजर व्हायला गेला तेव्हा फिटनेस प्रमाणपत्र मागितले गेले. त्यातून तो कोरोना बाधित असल्याचे समोर आले. उर्वरित रुग्ण पॉझिटिव्ह कशामुळे आले हे शोधाचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. 
साक्री शहरात कोरोना बाधित चारपैकी सर्वप्रथम आढळून आलेल्या 53 वर्षीय प्रौढाचा आधीच मृत्यू झाला आहे. अन्य तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात शुक्रवारी जे तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यातील दोघांची अद्याप कुठलीही "ट्रॅव्हल हिस्ट्री' मिळालेली नाही. मात्र, यातील ज्या 27 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय तो याच आठवड्यात पत्नीला घेण्यासाठी नाशिकला जाऊन आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तो मूळ शिरूड (ता. धुळे) येथील रहिवासी असून नोकरीनिमित्त येथील आदर्शनगर परिसरात भाड्याच्या घरात पत्नीसह राहत होता. 
तिघांमध्ये एक 57 वर्षीय महिला, 80 वर्षीय वृद्ध, तर 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. याआधी मृत्यू झालेला 53 वर्षीय प्रौढ आणि आजारी असलेली 57 वर्षीय महिला, 80 वर्षीय वृद्ध साक्री शहरातील पोळा चौक परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दाव्यानुसार ते आजारी असल्याने गेल्या दोन ते तीन महिन्यात कुठेही बाहेर गेलेले नाहीत. 

27 वर्षीय तरुण नाशिक रिटर्न 
शहरातील 27 वर्षीय बाधित तरुण शिवाजीनगर (ता. साक्री) येथील सौरऊर्जा प्रकल्पात नोकरीस आहे. त्याचा 12 एप्रिल ते 22 एप्रिल या दरम्यान साक्री- शिरूड- नाशिक आणि मग साक्री, असा प्रवास झाला आहे. 22 एप्रिलला शिवाजीनगर येथील प्रकल्पात नोकरीवर पुन्हा रुजू होण्यासाठी तो गेला असता त्याला फिटनेस प्रमाणपत्र आणण्यास वरिष्ठांनी सांगितले. त्यावेळी तो पॉझिटिव्ह आढळून आला. तो नोकरीच्या ठिकाणासह शिरूड येथील जवळपास 72 जणांच्या संपर्कात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com