live
live

चौदा वर्षाखालील विभागीय शालेय खो-खो स्पर्धेत शासकीय कन्या शाळा विजयी

      नाशिक :१४ वर्षा खालील नाशिक विभाग शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन  दि . १५ ऑक्टो. दरम्यान धुळे येथे पार पडल्या .  उपउपांत्य फेरीचा पहिला सामना  जिल्हा परिषदेची शासकीय कन्या शाळा  विरुद्ध जळगाव  या दोन संघांमध्ये झाला .

हा सामना १२ विरुद्ध २ असा १ डाव १० गुणांनी नाशिकने सहज जिंकला . उपांत्य फेरीच्या सामन्यात नाशिकने धुळे संघाचा १ डाव व १ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला . अंतिम सामना शासकीय कन्या शाळा नाशिक विरुद्ध अनुदानित आश्रम शाळा खिर्डी या नाशिक मधीलच दोन संघांमध्ये झाला .

नाशिकच्या धारदार आक्रमणापुढे अनुदानित आश्रम शाळा खिर्डीचे खेळाडू बचाव करू शकले नाही .  मध्यंतराला  नाशिक कडे ११  विरुद्ध २ अशी विजयी आघाडी होती.  नाशिक कडून खेळतांना निशा बैजल नाबाद १ मिनिट , व चार मिनिटांचे संरक्षण करतांना तिने दोन गडी टिपले . तिला मनीषा पेडर ३ मिनिट ३० सेकंड व ३ गडी ,सोनाली पवार २ मिनिट १० सेकंड व १ गडी , वृषाली भोये नाबाद १ मिनिट व गडी , दीपिका बोरसे २  गडी, सोनाली हडळ १ मिनिट ५० सेकंड व १ गडी, दीदी ठाकरे दीड मिनिट यांनी आपल्या संघाच्या एकतर्फी  विजयात मोलाचा वाटा उचलला .

हा सामना नाशिक संघाने १ डाव ५ गुणांनी जिंकला . पराभूत संघाकडून खेळतांना ललिता गोबाले व पवना वाखे यांचा चांगला खेळ आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाही ..नाशिक महानगर पालिका क्षेत्रापासून ते विभागीय खो-खो स्पर्धेतील अंतिम सामान्य पर्यंत जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळेने सर्व सामने हे एक डाव राखून जिंकले . नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान शासकीय कन्याशाळेला प्रथमच मिळाला आहे . १४ वर्षाखालील शालेय खो-खो स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या शासकीय कन्या शाळेने थेट राज्यस्तरावर सहभागी होण्याचा पराक्रम केला आहे . 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com