नाशिक येथे शनिवारी सातवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिक : सातवे अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलन शनिवारपासून (ता. 24) विश्‍वास लॉन्स, सावरकरनगर येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी पंजाब येथील प्रसिद्ध कवियत्री श्रीमती इन्दरजीत नंदन यांची निवड करण्यात आली आहे.

 स्वागताध्यक्षाची जबाबदारी विश्‍वास ठाकूर यांच्यावर आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलाखती, खुले चर्चासत्र असे भरगच्च कार्यक्रम आहेत. 

संमेलनाची सुरूवात शनिवारी (ता. 24) सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. सकाळी दहाला संमेलनाचे उद्‌घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते होईल. यावेळी आमदार हेमंत टकले, महापौर रंजना भानसी, कवी किशोर पाठक यांची उपस्थिती असेल. साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी "दिव्यांग महिला अभिव्यक्तीतील अडथळे व उपाय' या विषयावर मिनाक्षी देशपांडे, पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यामध्ये शकुंतला परांजपे (बेळगाव), भावना विसपुते (नाशिक), निर्मला कौशिक (मध्य प्रदेश), शांताबाई कुलकर्णी (कोल्हापूर) या सहभागी होणार आहेत. दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी "दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा - 2016' या विषयावर होणाऱ्या परिसंवादात विजय कान्हेकर (मुंबई), संजय जैन (पुणे), रणजीत गोयल (गुजरात), पियुषकुमार द्विवेदी (उत्तर प्रदेश), नंदकुमार फुले (पुणे) हे आपले विचार मांडणार आहेत.

 सायंकाळी पाच वाजता होणाऱ्यात कथाकथनमध्ये अनंत ढोले आणि अनुराग वानरे यांचा सहभाग असेल. सायंकाळी 6 वाजता देशभरातून आलेल्या कवींचे खुले कविसंमेलन होईल. रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

रविवारीही भरगच्च कार्यक्रम 
रविवारी (ता. 25) सकाळी 9 वाजता "दिव्यांग व्यक्ती रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी - आव्हाने, यश अपयश' या विषयावर परिसंवाद होईल. सकाळी 10 वाजता बहुभाषिक कविसंमेलन होईल. दुपारी 12 वाजता पद्मश्री मुरलीकांत पेटकर (पुणे), हंसराज पाटील (नाशिक), भूषण तोष्णीवाल यांच्या यशोगाथा मुलाखतीद्वारे उलगडणार आहेत. दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिव्यांगांचे समायोजन' या विषयावर होणाऱ्या परिसंवादात जीन मिल (फ्रान्स), धनंजय भोळे (पुणे), अरूणकुमार (तमिळनाडू), जया राजू (आंध्र प्रदेश) हे सहभागी होणार आहेत. दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होईल. 

Web Title: marathi news divyang sahitya samelan