चायना, पेपर, नेटच्या आकाशकंदीलांचा झगमगाट 

चायना, पेपर, नेटच्या आकाशकंदीलांचा झगमगाट 

जळगाव ः दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर घराची सजावट करण्याचे काम केले जाते. दीपोत्सवानिमित्त घरासमोर लावण्यासाठी विविध आकारांचे रंगबिरंगी आकाशकंदीलांनी बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेत विविध आकारांचे आकाशकंदील दुकानाबाहेरच विक्रीसाठी ठेवले असून, रात्री या आकर्षक कंदीलांचा झगमगाट दिसत आहे. खास आकर्षण पेपर, नेट बॉल, वेलवेट तसेच "चायनामेड' आकाशकंदीलाला विशेष मागणी आहे. 

दिवाळी आली की सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण असते. आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर तयारी सुरू आहे. मार्केटमध्येही खरेदीसाठी आता गर्दी होऊ लागली आहे. दीपोत्सव कालावधीत विविध प्रकारचे आकाशकंदील, रोषणाईने घराची सजावट सुरू आहे. या कालावधीत 
प्रत्येक जण आपले घर सुशोभित करून प्रकाशमय वातावरण निर्माण करीत असतात. याकरिता बाजारातून आकाशकंदील खरेदीसाठी दुकानात गर्दी होताना दिसून येत आहे. 

दुकानांसमोर झगमगाट 
दीपोत्सवजवळ आल्याने शहरातील बाजारपेठेत विविध आकाश कंदीलांची दुकाने थाटण्यात आली आहेत. दुकानांवर विविध प्रकारचे आकाशकंदील दर्शनी भागात लावण्यात येऊन ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे. यात आकाशकंदीलांचे अनेक प्रकार असून, यात "चांदणी', "करंजी', "बॉल', "आकाशदीप', "पॅराशूट', "मंगलदीप', "लोटस' यासारखे विविध प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी आहेत. साधारण 100 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत दर आहेत. 


दिवाळीनिमित्त बाजारात आता हळूहळू ग्राहकांची गर्दी होत आहे. आकाश कंदीलचे नवीन प्रकार आले नसून चायना, पेपर, वेलवेट आदी विविध आकाशकंदील परवडेल अशा किमतीत आहे. दोन दिवसात ग्राहकांचा ओघ वाढेल. 
- रमेश कुमार, आकाश कंदील विक्रेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com