पाळीव श्‍वानांच्या नोंदणीचे बंधन, मालकाला पाठविणार नोटीस 

residentional photo
residentional photo

नाशिकः महापालिकेकडे पाळीव श्‍वानांच्या नोंदणीचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने उपचारासाठी दाखल होणाऱ्या पाळीव श्‍वानांची नोंदणी आहे की नाही, यावरून नसेल तर नोंदणी करून घेण्यास भाग पाडण्याची अजब शक्कल लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांना दिल्या आहेत. 
शहरात श्‍वान निर्बिजीकरणाचे प्रमाण अधिक असले तरी पाळीव श्‍वानांच्या नोंदणीचे प्रमाण अत्यल्प आहे. दर वर्षी शहरातील पाळीव श्‍वानांची नोंदणी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे करणे गरजेचे आहे. नोंदणीनंतर श्‍वान पाळण्याचा परवाना मिळतो. दर वर्षी परवान्यांचे नूतनीकरण करावे लागते. पाळीव श्‍वानाला अँटीरेबिज लस दिल्याची खात्री केल्यानंतर परवान्याचे नूतनीकरण केले जाते. मात्र जेमतेम 200 पाळीव श्‍वानांची नोंद होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com