महापरिनिर्वाण दिनासाठी आजपासून नागपूर-मुंबईहून विशेष रेल्वेगाड्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नाशिकः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने दादर (मुंबई) ला जाण्यासाठी मध्ये रेल्वेने अतिरिक्त दहा विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. येत्या 9 डिसेंबरपर्यत या विशेष रेल्वेगाड्या धावतील. अजनी, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, पुलगाव, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला जलंब, मलकापूर, भुसावळ, मनमाड, जळगाव, 40 गाव, नाशिक, इगतपुरी, कसारा कल्याण या स्थानकावर विशेष रेल्वेगाड्या थांबणार आहे. उद्या मंगळवारी (ता.4) 1282, बुधवारी 1264 आणि 1266 या रेल्वेगाड्या नागपूर स्थानकाहून सोडल्या जाणार आहे. सकाळी 7.50, दुपारी 3.55 आणि रात्री पावने अकराला नागपूरहून गाडी सुटणार आहे.

नाशिकः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्ताने दादर (मुंबई) ला जाण्यासाठी मध्ये रेल्वेने अतिरिक्त दहा विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे. येत्या 9 डिसेंबरपर्यत या विशेष रेल्वेगाड्या धावतील. अजनी, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, पुलगाव, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला जलंब, मलकापूर, भुसावळ, मनमाड, जळगाव, 40 गाव, नाशिक, इगतपुरी, कसारा कल्याण या स्थानकावर विशेष रेल्वेगाड्या थांबणार आहे. उद्या मंगळवारी (ता.4) 1282, बुधवारी 1264 आणि 1266 या रेल्वेगाड्या नागपूर स्थानकाहून सोडल्या जाणार आहे. सकाळी 7.50, दुपारी 3.55 आणि रात्री पावने अकराला नागपूरहून गाडी सुटणार आहे. परतीसाठी मुंबईहून गुरुवारी (ता.6) सायंकाळी सहा आणि पावणे सातला रेल्वेगाडी सुटेल. शुक्रवारी दादरहून मध्यरात्री साडेबाराला गाडी सुटेल. शनिवारी मुंबईहून सायंकाळी पावणे सातला दादरहून तसेच मध्यरात्री साडेबाराला विशेष रेल्वेगाडी सुटेल. 
 

Web Title: marathi news DR.AMBEDKAR MAHAPARINIRVAN DIN