आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय सहन करणार नाही- डॉ. अशोक उईके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

नाशिक ः आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आरोग्याची गैरसोय सहन करणार नाही, अशी तंबी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी यंत्रणेला दिली. तसेच दौऱ्यावर असताना आश्रमशाळांसह वसतिगृहांची पाहणी सुरु ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नाशिक ः आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आरोग्याची गैरसोय सहन करणार नाही, अशी तंबी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी यंत्रणेला दिली. तसेच दौऱ्यावर असताना आश्रमशाळांसह वसतिगृहांची पाहणी सुरु ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

धुळ्यातील आदिवासी विकास विभागाच्या खर्चाच्या आढावा घेतल्यानंतर डॉ. उईके नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रेल्वेने धामणगावला परतत असताना ते सरकारी विश्रामगृहात थांबले होते. आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहूल आहेर यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच अधिकारी, शिष्टमंडळाच्या त्यांनी भेटी घेतल्या. तळेगाव भामेर (ता. बागलाण) येथील आश्रमशाळेला त्यांनी भेट दिली. तेथील गैरसोयींमुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश डॉ. उईके यांनी अधिकाऱ्यांना दिले. शिवाय प्रकल्पाधिकाऱ्यांनी वसतिगृहाची पाहणी करुन तत्काळ अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. "सकाळ'शी बोलताना डॉ. उईके म्हणाले, की आदिवासी विद्यार्थी केंद्रस्थानी ठेऊन कामकाजाचा प्राधान्यक्रम ठरवण्याच्या सूचना अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कामावर गैरहजर असल्यांची गय केली जाणार नाही. 

वॉर्डन निवासी हवेत 
आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात वॉर्डन निवासी असावेत. वसतिगृहातील विद्यार्थिनींची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जावी. नियमित आरोग्य तपासणी व्हायला हवी. तसेच पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेकडे आणि मुबलकतेकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. याही बाबी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे डॉ. उईके यांनी स्पष्ट केले. 

वेतनवाढ रोखण्याचा "फॉर्म्युला' 
डॉ. उईके हे दौऱ्यावर असताना आश्रमशाळा आणि वसतिगृहात कुणालाही न सांगता जातात. थेट विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतात. त्यात त्यांनी त्रूटी आढळताच, संबंधितांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश जागेवर देतात. त्यांच्या या "फॉर्म्युला'मुळे आदिवासी विकास यंत्रणेला शिस्त लागण्यास मदत होणार आहे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news DR.ASHOK UEKE