डीआरडीओच्या नाशिकच्या संरक्षण  संशोधन प्रयोगशाळेला दोन पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नाशिक ः संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) ओझर येथील ऍडव्हान्स सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरियल्स (एसीईएम)च्या प्रयोगशाळेला राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात यंदाचा सायंटीस्ट ऑफ द इयर पुरस्कार येथील शास्त्रज्ञांना मिळाला आहे. 

नाशिक ः संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) ओझर येथील ऍडव्हान्स सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरियल्स (एसीईएम)च्या प्रयोगशाळेला राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात यंदाचा सायंटीस्ट ऑफ द इयर पुरस्कार येथील शास्त्रज्ञांना मिळाला आहे. 

डीआरडीओची ओझर येथील ऍडव्हान्स सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरियल्स (एसीईएम)च्या प्रयोगशाळा आहे. ओझरच्या या केंद्रात क्षेपणास्त्र कार्यक्रमांच्या विकास संशोधनाचे काम चालते. आधुनिक सुविधांनी युक्त या संरक्षण विभागाच्या वैज्ञानिक सल्लागारांनी यंदाच्या 2018 आर्थिक वर्षात दोन पुरस्कार मिळविले आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते येथील दोन शास्त्रज्ञांचा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्ताने नवी दिल्लीतील संरक्षण विभागाच्या डीआरडीओ भवानातील कोठारी सभागृहात संरक्षण मंत्र्याच्या हस्ते वितरित झाले. कार्यक्रमाला डीआरडीओचे अध्यक्ष व संरक्षण सचिव डॉ.एस. ख्रिस्टोफर, वैज्ञानिक सल्लागार डॉ. जी सतीश रेड्डी आदीच्या उपस्थित पुरस्कार वितरण झाले. 

दोन पुरस्कार 
ओझर एसीईएम प्रयोगशाळेतील सहसंचालक डॉ.एस.सी.भट्टाचार्य यांना घन इंधनावरील प्रक्रिया विकासाच्या योगदानासाठी सायंटिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला. 
तर प्रयोगशाळेतील आयुध आणि संसादन आभियांत्रिकीचे महासंचालक पी.के.मेहेता यांना व सहकाऱ्यासोबत क्षेपणास्त्राची क्षमता वाढविण्यास मदत करणाऱ्या घन रॉकेट 
इंधनावरील संशोधातील कुशल योगदानासाठी विशिष्ठ पुरस्कार देण्यात आला. त्यात, प्रयोगशाळेचे महाव्यवस्थापक श्रीनिवास शेषाद्री, डॉ.भट्टाचार्य, राजेंद्र पाटील, एस.के. 
मंडल, अशुतोष शर्मा, मोहम्मद जियाउर रहेमान, जी.सतीश कुमार, सी.एम.थोरात आदीचा समावेश आहे. 
 

Web Title: marathi news drdo prize distribution