दंड न भरताच पळणाऱ्याने धरली पोलिसांची गचांडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नाशिक : शरणपूर रोडवरील जुन्या पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलीस शाखेमध्ये टोईंग करून आणलेल्या दुचाकीची तडजोड रक्कम न भरताच पलायनाच्या प्रयत्न करणाऱ्यास वाहतूक पोलीसांनी रोखले असता, संशयितांनी वाहतूक पोलीसाचीच गच्ची पकडून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 शहर वाहतूक शाखेच्या युनिट दोनचे पोलीस नाईक श्री. वाटपाडे यांच्या फिर्यादीनुसार, ते काल (ता.16) जुन्या पोलीस आयुक्तालयातील शहर पोलीस वाहतूक शाखेमध्ये कर्तव्यावर होते. संशयित संतोष रघुनाथ वाघचौरे, भारत रघुनाथ वाघचौरे (दोघे रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांची दुचाकी (एमएच 15 एफएल 7938) टोईंग करून शहर वाहतूक शाखेमध्ये आणण्यात आले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघे संशयित शाखेत आले होते. परंतु त्यांनी दुचाकीची दंडाची रक्कम (तडजोड रक्कम) न भरताच दुचाकी घेऊन मागील गेटने निघून जात होते. 

 ही बाब कर्तव्यावर असलेले श्री. वाटपाडे यांच्या लक्षात आल्यानंतर यांनी दोघांनी हटकले आणि रोखले. त्यावेळी संशयित भारत वाघचौरे यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी वाटपाडे यांच्याशी वाद घालत अंगावर धावून गेला आणि गच्ची धरून धक्काबुक्की केली. या प्रकारात सरकारी गणवेशाचे नुकसान झाले. त्यामुळे याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात दोघा संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: marathi news driver and police quaral