जगातील "सुपर पॉवर' जलचलन ठरवेल  डॉ. सुनील कुटे,डॉ.परूळेकर जयंतीनिमित्त साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नाशिक ः बौद्धीक संपत्तीला मोबाईलचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे भविष्यात जगातील "सुपर पॉवर' जलचलन ठरवेल, असे प्रतिपादन कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी आज येथे केले. "सकाळ'चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त आय. एम. आर. टी. महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानात ते "वॉटर करन्सी' याविषयावर बोलत होते. 

नाशिक ः बौद्धीक संपत्तीला मोबाईलचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे भविष्यात जगातील "सुपर पॉवर' जलचलन ठरवेल, असे प्रतिपादन कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी आज येथे केले. "सकाळ'चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त आय. एम. आर. टी. महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानात ते "वॉटर करन्सी' याविषयावर बोलत होते. 

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार प्रमुख अतिथी होत्या. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, "मविप्र'चे शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील, प्रा. संजय शिंदे, प्राचार्य डी. के. मुखेडकर, विलास देशमुख, डॉ. आय. बी. चव्हाण, प्रा. बी. व्ही. कापडणीस, मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, कृष्णा पवार आदी उपस्थित होते.

अन्नधान्यासह वस्तूंच्या उत्पादनांसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लागणाऱ्या पाण्याला आभासी पाणी म्हटले जाते. सध्याच्या बाजारपेठीय व्यवस्थेत निर्मितीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या मूल्याचा निर्मिती खर्चात समावेश केला जात नाही, असे सांगून डॉ. कुटे म्हणाले, की पिकांच्या माध्यमातून आभासी रुपात पाणी मिळते. त्यामुळे जग वेगळ्यादृष्टीने पाण्याकडे पाहत आहे. त्यामुळे आभासी स्वरुपात पाण्याची होणारी साठवणूक धरणांना पर्याय ठरु शकतो काय? याचा अभ्यास व्हायला हवा. शिवाय पाणी एकीकडून दुसरीकडे नेण्याऐवजी पिकांची समृद्धी नेता येईल. चीनमध्ये दक्षिणमधून उत्तरेत 40 ते 50 दशलक्ष टन गहू नेला. हे त्यासाठीचे एक उत्तम उदाहरण आहे. 

कृती आराखडा अन्‌ धोरण हवे 
ते म्हणाले,आभासी पाणी व्यापाराला योग्य पीक, वस्तूंची यादी करावी लागेल. त्याचा कृती आराखडा करत धोरण निश्‍चित करावे लागेल. त्याचवेळी जलचलन, आभासी पाणी याविषयावर जनजागृती करावी लागेल जलचलनाला अनुसरुन पीकरचना ठरवावी लागेल. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल. देशातील आंतरराज्यीय पीक व्यापारात तेरा टक्के आभासी पाण्याची देवाण-घेवाण होत आहे. आभासी पाण्याचे निर्यातदार पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश ही राज्ये आहेत, तर आयातदार बिहार, झारखंड, ओरिसा, केरळ ही राज्ये आहेत. जगामध्ये आभासी पाण्याच्या निर्यातदार देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, थायलंड, अर्जेन्टिना, भारत, फ्रान्स आहेत. आभासी पाणी आयातदारांमध्ये श्रीलंका, जपान, नेदरलॅंड, चीन, दक्षिण आफ्रिकेचा समावेश होतो. सगळ्यात छोटा देश थायलंड हा निर्यातदार, तर सगळ्यात मोठा चीन आयातदार आहे. इस्त्राइल आणि जपानने अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची निर्यात थांबवली आहे. हे कमी काय म्हणून जॉर्डनमध्ये आभासी पाण्याची 60 ते 90 टक्के आयात होते. आभासी स्वरुपात नाईल नदी आयात केली गेली. जपानमध्ये 80 टक्के अन्नधान्य आणि 80 टक्के लाकूड आयात केले जाते. त्याद्वारे 600 कोटी टन पाणी वाचवले जाते. प्रत्यक्षात मात्र जपानमध्ये पाणीटंचाई नाही. आफ्रिकन अनेक देशात विपुल पाणी आणि अन्नसुरक्षा असली, तरीही ते आभासी पाण्याची आयात करतात. असे नमूद केले. 
डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी जागृतीचा वसा घेत केलेल्या पत्रकारितेचा वारसा "सकाळ'ने 87 वर्षे पुढे सुरु ठेवला आहे. "सकाळ' समकालीन राहिला, असे सांगत श्री. माने यांनी नागरीकरण आणि पाण्याचा वापर या ज्वलंत विषयावर चर्चा व्हावी म्हणून व्याख्यान होत असल्याची माहिती दिली. 

पाण्याच्या प्रमाणाची मोजणी 
(उत्पादन-निर्मितीसाठी लागणारे पाणी लिटरमध्ये) 
ब्रेड स्लाईस ः 40 सूप ः 10 
साखरेचे तुकडे एक किलो ः दीड हजार मिक्‍स सलाड ः 500 
कॉटन शर्ट ः अडीच हजार बीफ सलाड ः 2 हजार 
एक अंडे ः 135 चिकन स्टेक ः 2 हजार 
हमबर्गर ः 2 हजार 400 भात ः 500 
कागदाचे एक शीट ः 10 चीज ः 1 हजार 800 
2 ग्रॅम संगणकाची चीप ः 32 एक कप कॉफी ः 140 
एक लिटर दूध ः भारत-अडीच हजार, जपान-900 
(कमीत कमी पाण्यात दुधाचे उत्पादन महत्वाचे. देशात 14 कोटी टन दुग्धोत्पादन होते) 

निलीमाताई म्हणतात... 
0 "सकाळ'चा सकारात्मक दृष्टीकोन आहे आणि समाजाचे प्रबोधन करण्यासह समाजकारणाचा वसा घेतला आहे 
0 इराण आणि भारतामध्ये पाण्याचा वापर खूप होत असल्याने पातळी खलावत चालली आहे 
0 इंग्लंडमध्ये भूजलाचा वापर केला जात नाही. "रिसायकल'द्वारे पिण्यायोग्य पाणी बनवले जाते 
0 पाणीरुपी "लिक्वीड गोल्ड'चा अतिवापर आणि चुकीच्या पद्धतीने वापर थांबवावा 
0 प्रत्येकाने आपले पाणी साठवून ठेवावे आणि झाडे लावावेत. शेतकऱ्यांनी 25 टक्के क्षेत्रावर फळझाडे लावावीत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dr.parulekar jayanti program