दुष्काळग्रस्त जिल्ह्यात 36 टॅंकरने जिल्ह्यातील 103 गावे वाड्यांना पाणीपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नाशिक : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाई निर्मिण झाली टंचाईग्रस्त असलेल्या 103 गावे, वाडे आणि वस्त्यांना अवघ्या 36 टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. टंचाईची तीव्रता अधिक वाढल्यास प्रत्येक गावाला पाण्याचा टॅंकर पुरविण्यात येईल असे आश्‍वासन देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडून देण्यात आले आहे. 

नाशिक : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाई निर्मिण झाली टंचाईग्रस्त असलेल्या 103 गावे, वाडे आणि वस्त्यांना अवघ्या 36 टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. टंचाईची तीव्रता अधिक वाढल्यास प्रत्येक गावाला पाण्याचा टॅंकर पुरविण्यात येईल असे आश्‍वासन देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडून देण्यात आले आहे. 

खरीप हंगामा बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रस्तावित व मंजूर गावातील पाणी टंचाई बाबत तपासणी पथक समित्या नेमून पडताळणी करणेबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन याबाबत सूचना दिल्या व पडताळणीसाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, उप अभियंता लघु पाटबंधारे विभाग, उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचे एकूण 11 तपासणी पथक तयार करून प्रस्तावित व मंजूर टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून पाहणी अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. 

जिल्ह्यातील पाणीटंचाई असलेल्या 133 (मंजूर 55 गाव व 42 वाड्या असे एकूण 97 तर प्रस्तावित 20 गाव व 15 वाड्या) गाव आणि वाड्या वस्त्यांची 11 तपासणी पथकांद्वारे पडताळणी करण्यात आली असून त्यानुसार पाण्याची आवश्‍यकता असलेल्या 7 तालुक्‍यामधील 66 गावे व 37 वाड्या अशा एकूण 103 गावे/वाड्या/वस्त्यांना 36 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली. 

तपासणी पथकाच्या पाहणी अहवालानुसार मंजूर व प्रस्तावित टंचाईग्रस्त 4 गावांमधील गाव वगळता इतर सर्व गाव व वस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्‍यकता असल्याचे निदर्शनास आले. टंचाईने बिकट स्वरुप धारण केल्यास प्रशासनाने उपाययोजनांचे नियोजन केले असून प्रत्येक टंचाईग्रस्त गावाला पाणी पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी सांगितले. 

पाणीपुरवठा गावे 
तालुका गावे वाड्या टॅंकरची संख्या (खासगी+शासकीय)
 
बागलाण 19 1 14 
देवळा 1 0 1 
मालेगाव 5 2 4 
नांदगाव 5 26 3 
सुरगाणा 5 1 2 
सिन्नर 2 5 2 
येवला 29 2 10 
 

Web Title: MARATHI NEWS DRY AREA IN TANKAR