दुबईत विठू नामाचा गजर,पालखी सोहळा रंगला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

दुबई-आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठूमाऊलीचा गजर करत दुबईत पालखी सोहळा रंगला. या सोहळ्यात दुबईस्थित मराठी बांधवांनी हिरारीने सहभागी होत आनंद लुटला.  मराठी वेशभूषा करत कुटुंबासह सहभागी झालेल्या पुरुष,महिला आणि चिमुरड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. .पालखीसह- टाळ गजर,, फुगड्या ,डोईवरील तुळसी वृंदावन ,कपाळावर टिळे,टोपी उपरणे, २५ छोटे वारकरी  टाळ मृदंगाच्या गजरात नृत्य करत पुढे पुढे जात होते.  उत्साह वाही वारकऱ्याचा । मुखी जयघोष हरिनामाचा..! यासारख्या भजनाने साऱ्याचेच लक्ष वेधले.

दुबई-आषाढी एकादशीचे औचित्य साधत विठूमाऊलीचा गजर करत दुबईत पालखी सोहळा रंगला. या सोहळ्यात दुबईस्थित मराठी बांधवांनी हिरारीने सहभागी होत आनंद लुटला.  मराठी वेशभूषा करत कुटुंबासह सहभागी झालेल्या पुरुष,महिला आणि चिमुरड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. .पालखीसह- टाळ गजर,, फुगड्या ,डोईवरील तुळसी वृंदावन ,कपाळावर टिळे,टोपी उपरणे, २५ छोटे वारकरी  टाळ मृदंगाच्या गजरात नृत्य करत पुढे पुढे जात होते.  उत्साह वाही वारकऱ्याचा । मुखी जयघोष हरिनामाचा..! यासारख्या भजनाने साऱ्याचेच लक्ष वेधले. महाराष्ट्रात जे सुट्यांसाटी आले त्यांना पंढपरुला विठू माऊलीच्या दर्शनाची संधी मिळाली,पम दुबईत हे शक्य नसल्याने तिकडेच हा अनोखा सोहला साजरा करत पंढपुरची अनुभूती प्रत्येकाने घेतली.  कांचन माणिक पुजारी आणि माऊली सोहळा मंडळाचा दांडगा उत्साह यानिमित्ताने पहायला मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dubai palkhi sohla