वर्दीच्या नाकावर टिच्चून, दुहेरी वाहतुकीची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

नाशिक ः शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे अनेक ठिकाणी नव्याने "वन वे'चे (एकेरी वाहतूक) नियोजन करण्यात आले आहे. नव्याने एकेरी करण्यात आलेल्या या मार्गावरील वाहनधारकांना शिस्त लागावी, म्हणून मोठ्या प्रमाणावर दंडही वसूल केला जात आहे. मात्र त्याच वेळी शहरातील जुन्या एकेरी मार्गावरून सर्रास सुरू असलेल्या दुहेरी वाहतुकीमुळे कायदा पाळणाऱ्या वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

वाहनांच्या संख्येत वाढ होऊनही रस्ते मात्र तेवढेच राहिल्याने अनेक भागांत वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. मात्र यावर उपाय म्हणून पोलिसांच्या वाहतूक शाखेने प्रायोगिक तत्त्वावर अनेक भागांतील दुहेरी वाहतूक एकेरी केली आहे. यात वर्दळीच्या शरणपूर, गंगापूर तसेच सीबीएसजवळील काही रस्त्यांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी उतरवून वाहनधारकांकडून दंडाची वसुली केली जात आहे. मात्र नव्याने मार्ग एकेरी करत असताना पूर्वीच्या एकेरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर दुतर्फा वाहतूक सुरू झाल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. 
सर्वाधिक वर्दळीच्या अशोक स्तंभ ते रविवार कारंजा व रविवार पेठ ते टिळक पथ सिग्नल हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र चक्क वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोर "भाईगिरी' करणारे थेट रविवार कारंजाकडून दुचाकी थेट अशोक स्तंभापर्यंत नेतात. हाच प्रकार टिळक पथ सिग्नलवर दिसून येते. यामुळे अपघात व वादावादीच्या प्रसंगांमध्येही मोठी वाढ झाली आहे. पंचवटीतील रामकुंडाकडून मालेगाव स्टॅन्ड सिग्नलकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक रस्त्याच्या मधोमध लावला आहे. रामकुंडाकडून मालेगाव स्टॅन्डकडे येणारी वाहने रामकुंड पोलिस चौकीशेजारील सिंहस्थात नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्याने जाणे अपेक्षित आहे, परंतु येथेही सर्रास एकेरी मार्गातूनच दुचाकी व चारचाकी मालेगाव स्टॅन्ड सिग्नलवर आणली जातात. विशेष म्हणजे रामकुंड व मालेगाव स्टॅन्ड या दोन्ही ठिकाणी वाहतूक शाखेचा पोलिस कर्मचारी हजर असतो, परंतु त्याच्यासमोर सर्रास वाहने एकेरी मार्गावर नेली जातात. 
 
शहरातील एकेरी वाहतुकीची ठिकाणे 
-रविवार पेठ ते टिळक पथ सिग्नल 
-अशोक स्तंभ ते रविवार पेठ 
-डॉ. वडगावकर दवाखाना ते टिळक पथ सिग्नल 
-कालिदास कलामंदिर ते सीबीएस सिग्नल 
-मालेगाव स्टॅन्ड ते रामकुंड 
-मॅरेथॉन चौक ते सुश्रूत हॉस्पिटल चौक 

Web Title: marathi news duheri vahtuk