नकली सोने तारण ठेवून बिझनेस बॅंकेला 40 लाखांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नाशिक : गोल्ड व्हॅल्युअरने दिलेल्या सोन्याच्या खोट्या दाखल्यावर दोघा संशयितांनी तब्बल 39 लाख 86 हजार रुपयांचे कर्ज घेत बिझनेस को-ऑप. बॅंकेला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संशयित गौरव मुरलीधर मालुसरे (रा. स्वामी बंगला, वृंदावननगर, म्हसरुळ), सोनिया सुहास बनसोडे (रा. नाशिक) व गोल्ड व्हॅल्युअर अनिरुद्ध अविनाश मोरे या तिघांविरोधात सरकारवाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
एम.जी. रोडवरील बिझनेस को-ऑपरेटिव्ह बॅकेचे अधिकारी विशाल अरुण दाणी (रा. प्रेरणा बिल्डिंग, माणिकनगर सोसायटी, गंगापूर रोड्‌न) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गौरव मालुसरे याने 881.860 ग्रॅम व सोनिया बनसोडे हिने 1233.540 ग्रॅम बनावट सोने बॅंकेकडे तारण ठेवून त्यावर कर्जांचे प्रकरण करावयास आले होते. डिसेंबर 2017 मध्ये संशयितांनी बनावट सोने तारण ठेवताना बॅंकेचे गोल्ड व्हॅल्युअर संशयित अनिरुद्ध अविनाश मोरे याने सदरचे सोने तपासले आणि सदरचे सोने हे बनावट असतानाही संशयितांना त्याने सोन्याचे दागिने खरे असल्याचे बनावट दाखला दिला. तसेच, सदरचे बनावट सोने बॅंकेत जमा करतानाही तिघा संशयितांनी समक्ष स्वाक्षरी केली. त्यानुसार, बॅंकेने संशयित मालुसरे यास 15 लाख आणि संशयित बनसोडे हिला 24 लाख 86 हजार रुपयांचे कर्ज दिले. र्बंकेने कर्ज दिल्यानंतर संशयितांनी कर्जाचे हप्ते वा व्याजाचे हप्त्यांची परतफेड केली नाही. त्यानंतर बॅंकेने संशयितांनी दिलेल्या सोन्याची तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे उघडकीस आले.

 संशयितांनी बॅंकेची आर्थिक फसवणूक करीत, पैशांचा अपहार केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: marathi news dupliate gold