बनावट डॉक्‍टरांविरोधात आरोग्य विभागाकडून गुन्हे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

घोटी - शहरातील बनावट पदवीधारक बनावट डॉक्‍टरांवर घोटी पोलिस ठाण्यात तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पवार यांनी गुन्हे दाखल केले. सरकारच्या डोळ्यात धूळफेक करत पंधरा वर्षांपासून बनावट पदवीद्वारे वैद्यकीय व्यवसाय करीत हे डॉक्‍टर जनतेची फसवणूक करीत होते. 

नागरिकांकडून बोगस डॉक्‍टरांवर सातत्याने होत असलेल्या तक्रारींची दिवसागणिक वाढ होत आहे. शहरात भंडारदरा मार्गावर रुग्णालय उघडून बनावट डॉक्‍टरांनी एकत्रितपणे व्यवसाय थाटला होता. याच रुग्णालयात गेल्या पंधरवड्यात चुकीच्या उपचार पद्धतीने नवजात बालकासह अकरावर्षीय शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. यामुळे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आमदार निर्मला गावित, आमदार डॉ. अपूर्व हिरे आदींनी निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. याची दखल घेत संजय पवार यांनी या डॉक्‍टरांवर वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल होताच डॉक्‍टरांनी पोबारा केल्याचे समजते.

Web Title: marathi news duplicate doctor ghoti