अहो ऐकलंय का....."ई-बर्ड' ऍपवर आढळले नाशिकचे ८०० पक्षी

live
live

... 
नाशिक ः पक्षी संवर्धनासाठी "ई-बर्ड' ऍप हा पर्याय राहणार आहे. ठराविक ठिकाणी पक्षीगणना करण्यापेक्षा इतर ठिकाणे शोधून तेथील पक्ष्यांवर अभ्यास होणे आवश्‍यक आहे. पर्यटक आणि पक्षी मित्रांसाठी "ई-बर्ड' ऍप हा "ग्लोबल कॉमन प्लटफॉर्म' असेल. "डिजिटल पर्सनल डायरी' बनवता येईल, असे बेंगळुरूच्या बर्ड काऊटिंग इंडिया संस्थेच्या पूजा पवार यांनी सांगितले. 

"ई-बर्ड' ऍपची सुरवात 2002 मध्ये अमेरिकेत झाली. भारतात 2014 मध्ये हे ऍप सुरू आले. त्याचे नियंत्रण बर्ड काऊटिंग इंडिया ही संस्था करत आहे. भारतात बाराशे जातीचे पक्षी असून, या संस्थेने पक्ष्यांचा या माध्यमाचा वापर करून त्यांची वसतिस्थाने कुठे दिसतात, याची माहिती पक्षीमित्रांच्या माध्यमातून जमा केली आहे. ऍपमध्ये नाशिक जिल्ह्यातील 800 पक्ष्यांची नोंद मिळते. परदेशात "बर्ड टुरिझम' वाढत असून, त्याचा फायदा आपल्याला घ्यावा लागेल, असे सांगून त्या म्हणाल्या, की "ई-बर्ड' ऍपमध्ये पक्ष्यांची नोंद, छायाचित्र, ठिकाण, वेळ, दिवसाची नोंद असल्याने पक्षी केव्हा दिसला, याची माहिती मिळते. 

नेचर क्‍लब ऑफ नाशिक, ग्राम परिस्थितीकी विकास समिती आणि वन विभागातर्फे नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात झालेल्या पक्षी सप्ताहांतर्गत पूजा पवार यांनी कार्यशाळा घेतली. अभयारण्यातील गाइड, वन कर्मचारी त्यासाठी उपस्थित होते. "नेचर कॉन्झरवेशन'च्या प्रतीक्षा कोठुळे, वनपाल अशोक काळे, समिती अध्यक्ष अमोल दराडे, अभयारण्यातील गाइड उपस्थित होते. गंगाधर अघाव यांनी आभार मानले. या वेळी पूजा पवार यांनी ऍपविषयी माहिती दिली. 

"ई-बर्ड' ऍपमधून काय दिसले? 
0 चिमण्यांची संख्या ना वाढली ना कमी झाली 
0 रेड नेक फालकन हा पक्षी पन्नास टक्‍क्‍यांनी कमी झाली 
0 प्रीनिया पक्ष्यांचे प्रमाण वाढले 
0 शिकारी पक्ष्यांची संख्या "जैसे थे' 
0 गिधाडांची संख्या 80 टक्‍क्‍यांनी कमी झाली 
0 पाण्याजवळील पक्षी पन्नास टक्‍यांनी कमी 
... 

आम्ही देशात "ई-बर्ड' ऍप वापरावे, यासाठी जनजागृती करीत आहोत. पक्षी संवर्धनासाठी हे ऍप महत्त्वाचे असून, "बर्ड टुरिझम' वाढविण्यासाठी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आवश्‍यक आहे. 
- पूजा पवार, बर्ड काऊटिंग इंडिया, बेंगळुरू 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com