दीर्घकाळ चालणारे खग्रास चंद्रग्रहण उद्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नाशिकः एकविसाव्या शतकातील (2001 ते 2100) या काळातील सर्वांत दीर्घकाळ चालणारे खग्रास चंद्रग्रहण उद्या (ता. 27) दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा कालावधी तीन तास 55 मिनिटांचा असेल. भारतासह आशिया खंड, युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये ग्रहण दिसणार आहे. 

शुक्रवारी रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी ग्रहणाला प्रारंभ होईल. उत्तररात्री 1 ते 1 वाजून 55 मिनिटांपर्यंत ग्रहण दिसणार आहे. 28 जुलैला पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी ग्रहण संपेल. याच दिवशी सूर्यमालेतील क्रमांक चारचा तांबडा ग्रह मंगळ प्रतियुतीमध्ये येत असून, 2003 नंतर प्रथमच तो इतक्‍या कमी अंतरावर येत आहे. 27 जुलैला सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि मंगळ एकाच रेषेत येणार आहेत. या वेळेस खग्रास स्थितीतील तांबडा चंद्र व तेजस्वी तांबडा मंगळग्रह दोन्हीही आकाशात लक्ष वेधून घेणार आहेत.

या काळात गडद लाल रंगाचा चंद्र दिसणार असून, त्याला "ब्लड मून' असे म्हटले जाते. ग्रहणकाळात 40 टक्के जास्त मोठा चंद्र बघायला मिळणार असून, खगोलप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट असेल. या दिवशी ढगाळ हवामान असेल, तर बघण्यासाठी अडचणी येऊ शकतात. मात्र, स्वच्छ आकाश असेल तर छायाचित्रकार, आकाशप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. 

कोणतेही उपकरण न वापरता ग्रहण आपण सहजपणे पाहू शकणार आहोत. लोकांमध्ये ग्रहणांविषयी खूप गैरसमज आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आकाश निरीक्षण करणाऱ्यांसाठी, तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रहण पाहणे म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. 
-अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर 

Web Title: marathi news eclips

टॅग्स