विश्‍वशांती अहिंसा संमेलनासाठी सोमवारी राष्ट्रपती मांगीतुंगीला

residentional photo
residentional photo

नाशिक ता. 19: संपूर्ण जगात शांतीचा संदेश पोहचवावा, सर्वांना अहिंसेच्या मार्गावर चालावे, जैन धर्माच्या शिकवणीप्रमाणे संपूर्ण जगाने जगा आणि जगू द्या याचे आचारण करावे या हेतूने सोमवार(ता.22) पासून  मांगी-तुंगी येथे भगवान ऋषभदेव 108 फूट मूर्ती कमेटीतर्फे तीन दिवसीय विश्‍वशांती अहिंसा संमेलन होत आहे. या सोहळ्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी असतील,अशी माहिती साध्वी ज्ञानमती माता यांनी आज दिली. 

सोमवारपासून सुरू होणाऱ्या या विश्‍वशांती अहिंसा संमेलनाचे उद्‌घाटन भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनानिमित्त धार्मिक तसेच विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याकरीता संपूर्ण देशभरातून हजारोंच्या संख्येने जैन बांधव यावेळी उपस्थित राहणार आहे. 
या विश्‍वशांती अहिंसा संमेलनात यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, तालिका विधानसभा पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार, आमदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com