#BattleForNashik पडद्याआड बंडखोरांच्या मिन्नतवाऱ्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

नाशिक, ः नाशिक मतदारसंघात 23 उमेदवार रिंगणात असल्याने मतविभागणी टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून बंडखोरांच्या मिन्नतवाऱ्या सुरू आहेत. येत्या गुरुवारी 
(ता. 11) दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत असल्याने अखेरच्या दोन दिवस पडद्याआडच्या घडामोडींना वेग आला आहे. 

नाशिक, ः नाशिक मतदारसंघात 23 उमेदवार रिंगणात असल्याने मतविभागणी टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून बंडखोरांच्या मिन्नतवाऱ्या सुरू आहेत. येत्या गुरुवारी 
(ता. 11) दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत असल्याने अखेरच्या दोन दिवस पडद्याआडच्या घडामोडींना वेग आला आहे. 
नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे ऍड. माणिकराव कोकाटे यांची बंडखोरी शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे आठवड्यापासून शिवसेनेचे नेते ऍड. कोकाटे यांच्या उमेदवारीच्या माघारीसाठी प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर कोकाटे यांना माघारीसाठी तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र अजून तरी भाजपला त्यात यश आलेले नाही. उलट कोकाटे यांनी जाहीर मेळावा घेत अधिक जोमाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यात कोकाटे यांचे जुने कॉंग्रेस समर्थक कार्यकर्ते त्यात सहभागी झाल्याने कोकाटे यांच्या बंडाची धार दिवसेंदिवस वाढत आहे. जशी कोकाटे यांची उमेदवारी महायुतीला अडचणीची आहे

 वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या मतांना दणका बसणार आहे. त्यामुळे महायुतीतर्फे उघड नसले तरी पडद्याआड थेट वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांना दूरध्वनी करून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पूर्वकल्पना असल्याने यापूर्वीच माजी मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे कॉंग्रेस आघाडीत वंचित आघाडीने सहभागी व्हावे, यासाठी ऍड. आंबेडकर यांना भेटून आले. त्यानंतरही विविध पातळ्यावर अजूनही वंचित आघाडीशी जुळवून घेण्यासाठी पडद्याआडचे सर्वतोपरी प्रयत्न आघाडीच्या गोटातून सुरू आहेत. आघाडीला त्यात यश आले नाही, उलट उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन करीत वंचित आघाडीने धार वाढविली.  
 

Web Title: marathi news eclips