#BattleForNashik नाशिकला 18 तर दिंडोरीत 8 उमेदवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नाशिकः लोकसभा निवडणूकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज नाशिक मतदार संघातून 5 तर दिंडोरी मतदार संघातून एका उमेदवाराने माघार घेतल्याने नाशिकला 18 तर दिंडोरीत 8 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 

नाशिकः लोकसभा निवडणूकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज नाशिक मतदार संघातून 5 तर दिंडोरी मतदार संघातून एका उमेदवाराने माघार घेतल्याने नाशिकला 18 तर दिंडोरीत 8 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 
   उमेदवारी अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस होता. त्यामुळे मतविभागणीत हिस्सेदार ठरु शकतील अशा उमेदवारांच्या माघारीसाठी दोन दिवसांपासून सुरु असलेले प्रयत्न आज आकाराला आले. जि.प.सदस्य सिमांतिनी कोकाटे यांनी अर्ज मागे घेतला. बाजीराव (करण) गायकर,महेश आव्हाड, रमेश भाग्यवंत, राजू कटाळे या पाच उमेदवारांनी नाशिक मधून अर्ज मागे घेतले. हे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत माघारीसाठी आले होते. 

चिठ्ठी काढून फैसला 
कप बशी या चिन्हासाठी पवन पवार (वंचित बहुजन आघाडी) आणि विनोद शिरसाठ (हिंदुस्थान जनता पार्टी) या दोन नोंदणीकृत पक्षांनी मागणी केली होती. त्यामुळे शाळेतील एका विद्यार्थ्याला बोलावून चिठ्ठी काढून चिन्ह वाटले गेले. त्यात, पवार यांची लॉटरी लागली. 
 
Web Title: marathi news eclips