इगतपुरीत पावसाची जोरदार बॅटींग,भावली १०० टक्के भरले,दारणेतून तेराहजार क्युसेकचा विसर्ग

ज्ञानेश्वर गुळवे
शनिवार, 27 जुलै 2019

अस्वली स्टेशन-:इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहे. भावली धरण शंभर टक्के भरले असून दारणा धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून आज सकाळी दहा वाजता १२९९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. 

 अस्वलीच्या लष्करी हद्दीतही संततधार पावसाने मूकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील ओंडओहोळ नदीलाही पूर आला असल्याने त्यातच दारणाचा विसर्ग सोडल्यामुळे दारणापात्र तुडुंब भरून वाहू लागले आहे.  दारणा नदीला  महापुराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. प्राशसन सतर्क असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news egatpuri rain