राष्ट्रीय एकता दौडमध्ये धावले जळगावकर 

live photo
live photo

जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात "रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकतेसाठी जळगावकरांनी दौड लावली. 
जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, गृहरक्षक दल, जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव रनर ग्रुप व महापालिका यांच्यावतीने शहरातून "रन फॉर युनिट'चे आयोजन केले होते. शहरातील खानदेश मॉलपासून दौडला सुरवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. याप्रसंगी महापालिकचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, जळगाव रनर्स ग्रुपचे डॉ. विवेक पाटील, डॉ. उमेश पाटील, डॉ. प्रशांत देशमुख, समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह तहसिलदार वैशाली हिंगे, तहसिलदार प्रशांत कुलकर्णी, मनपा उपायुक्त मिनिनाथ दंडवते, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलाभ रोहण, पोलीस निरीक्षक गोरक्ष शिरसाठ, युनुसखान पठाण, बापू रोहम तसेच मनपा, गृहरक्षक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने संख्येने सहभागी झाले होते. 
 
शपथ घेवून धावले 
एकता दौडच्या सुरूवातीस सकाळी सहाला रनर ग्रुपच्यावतीने योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली. यानंतर दौडला सुरवात झाली. ही दौड नेहरू चौक- टॉवर चौक- चित्रा चौक- नेरी नाका- पांडे डेअरी चौक मार्गे स्वातंत्र्य चौक आणि तेथून बसस्टॅंड समोरून जावून शिवाजी चौक नंतर खानदेश मॉल येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत रनर्स ग्रुपचे सदस्य, शहरातील खेळाडू, विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com