विधान परिषदेच्या 4 जागांसाठी  25 जूनला होणार मतदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नाशिक ः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये नाशिक, मुंबई शिक्षक अन्‌ मुंबई, कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. चारही मतदारसंघासाठी 25 जूनला मतदान होत आहे. यापूर्वी शिक्षक उन्हाळ्याच्या सुटीवर असल्याने 8 जूनला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 

डॉ. अपूर्व हिरे, कपील पाटील, डॉ. दीपक सावंत, निरंजन डावखरे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2018 ला संपत असल्याने आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 31 मेस निवडणुकीची आचारसंहिता जारी होईल. 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 8 जूनला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 11 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतीम मुदत आहे. 25 जूनला सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत मतदान होईल. 28 जूनला मतमोजणी होणार असून आयोगाने आचारसंहिता लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 
 
Web Title: marathi news election declare