residenational photo
residenational photo

विधान परिषदेच्या पंधराही मतदान केंद्राचे चित्रिकरण

नाशिकः विधान परीषद निवडणुकीत 15 मतदान केंद्राचे संपुर्ण व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. कोणालाही मोबाईल व इलेक्‍ट्रॉनीक्‍स वस्तु आत नेण्यास परवानगी दिली जाणार नाही.मतपत्रीकेवरील थोडीशी चुकही मतदान बाद ठरवु शकते. त्यामुळे मतदान प्रक्रीया समजुन घ्या. गोपनीयता पाळा. अशी माहीती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी आज येथे दिली. 

येत्या 21 मेस होणाऱ्या विधान परीषद निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आज उमेदवारांना मतदान प्रक्रीया व मतमोजनी तयारीची माहीती देण्यासाठी जिल्हाधीकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात श्री. राधाकृष्णन बोलत होते. ते म्हणाले,21 मेस सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत मतदान होणार आहे तालुका स्तरावर तहसील कार्यालयात व नाशिक येथे रोजगार हमी उपजिल्हाधीकारी कार्यालयात मतदान केंद्र आहे. मनमोजनी नंतर मतपेट्या कोशागारात कडेकोट बंदोबस्तात ठेवल्या जाणार आहे. गुरुवारी 24 मेस मतमोजनी होणार आहे.त्यासाठी सकाळी साडे सहापासुन मतपेटया बाहेर काढल्या जातील. 

यंदा 644 मतदार आहेत. त्यांना पुरावा दाखवील्या शिवाय मतदान करता येणार नाही.मतदान ओळखपत्र व आधारकार्ड असलेच पाहीजे.मतदारांनी मतदान करतांना गोपनीयता पाळणे गरजेचे आहे.मतदान शांततेत व्हावे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

असे करा मतदान 
मतदान करतांना मराठी, इंग्रजी व रोमन लिपीतील आकडे टाकुनच करावे, पहीला क्रमांक एखाद्या उमेदवाराला दिलाच पाहीजे. नोटा ला एक नंबर दिल्यास मतदान बाद ठरेल, तसचे मत पत्रीकेवर अंगठा, सही किंवा कोणतीही ओळख दाखवीणरे चिन्हा केल्यास मतपत्रीका बाद होईल.जांभळ्या शाहीनेच मतदान करता येईल. मोबाईल व इलेक्‍ट्रॉनीक्‍स वस्तु मतदान केंद्रात नेता येणार नाही. उमेदवारांबरोबर कर्मचाऱ्यांनाही तोच नियम असेल.असे श्री.राधाकृष्णन यांनी स्पष्ट केले. यावेळी उमेदवार नरेंद्र दराडे, परवेज कोकणी यांच्या शंकांचेही त्यांनी निरसन केले.निवासी उपल्हाधीकारी रामदास खेडकर, निवडणुक अधीकारी प्रज्ञा बढे, गणेश राठोड,चंद्रशेखर देशमुख आदी अधीकारी उपस्थीत होते. 

मतदान केंद्र तेथील मतदार असे 
नाशिक 160, दिंडोरी 26,पेठ --22,इगतपुरी27, 
त्रंबकेश्‍वर 24, निफाड29, सिन्नर 39, येवला 34, मालेगाव 97, नांदगाव 60, चांदवड 24, कळवण 25, देवळा 23, बागालन 32, सुरगाणा 22 असे एकुन 644 मतदार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com