ई-मेल हॅक करून उद्योजकाला साडेचार लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मे 2019

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकाच्या कंपनीचा ई-मेल हॅक करून अज्ञात संशयिताने ऑनलाईन व्यवहार करत तब्बल 4 लाख 62 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकाच्या कंपनीचा ई-मेल हॅक करून अज्ञात संशयिताने ऑनलाईन व्यवहार करत तब्बल 4 लाख 62 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

 नरेंद्र नारायण लोळगे (रा. नाशिक) यांची सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाईस परिसरात इन्स्टो कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीच्या ई-मेलवरून त्यांचे अनेकांशी व्यावसायिक संबंध असल्याने त्याद्वारे त्यांचे व्यवहारही होत असतात. त्यांच्याच कंपनीच्या ई-मेल अज्ञात संशयिताने हॅक केला. त्यांच्या मेलवरील माहिती संशयिताने चोरून घेतली आणि त्यातील त्यांचा व्यवहार असणाऱ्या एस्सेल प्रोपॅक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्याच नावाचा बनावट ई-मेल संशयिताने तयार केला.

या मेलवरून संशयिताने नरेंद्र लोळगे यांच्या कंपनीच्या ई-मेलवर व्यवहारासंदर्भातील मेल केला आणि त्यांना आयसीआयसीआय बॅंकेच्या खात्यावर वारंवार पैसे टाकण्यास सांगितले. नरेंद्र लोळगे यांनीही 18 मार्च ते 30 मार्च या दरम्यान तब्बल 4 लाख 62 हजार 315 रुपये वर्ग केले. पण पैसे टाकून त्यांचा कंपनीकडून कोणताही प्रतिसाद(रिप्लाय) आला नाही. त्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी कंपनीकडे चौकशी केली. त्यावेळेस त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी नाशिक सायबर पोलीसात धाव घेत अज्ञात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news email hack