आपत्तकालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र कक्ष कार्यरत

residenational photo
residenational photo

नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेन शहरात आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून पालिका मुख्यालयात मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष व विभागिय कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे. पावसाळा संपेपर्यंत सात दिवस चोविस तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु राहतील. 

दरवर्षी प्रमाणे यंदाही पालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यात नदी काठच्या 143 झोपडपट्ट्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पूराची माहिती तातडीने पोहोचविण्यासाठी "एसएमएस' च्या माध्यमातून पुर्वसुचना दिली जाणार आहे. 

शहरात पाणी साचणारे 493 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. पाणी तुंबू नये म्हणून नालेसफाईच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पुरपरिस्थितीसाठी दोन बचाव व शोध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अग्निशमन दलाकडील रबर बोट, फायबर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, क्रॉक्रीट कटींग मशिन, कॉम्बी रेस्क्‍यू टूल्स, टॉर्चेस, दोन अत्याधुनिक रेस्क्‍यू व्हॅन आदी यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.

वादळामुळे झाडे कोलमडल्यास किंवा वृक्षांच्या फांद्या हटविण्यासाठी अग्निशमन दलाची यंत्रणा सज्ज राहणार आहे. आठ फिरते वैद्यकीय पथक, तरण तलावांवरील जीवरक्षक, पोहणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नदी काठी 50 जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत.

पुर आल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी महापालिकेच्या 127 तर खासगी 229 शाळा व महापालिकेची शंभर समाजमंदीरांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अतिरीक्त खाटांची व्यवस्था करण्यात आली असून विभाग निहाय खासगी रुग्णालये व औषधांच्या दुकानांची यादी तयार करण्यात आली आहे. 

आपत्ती विभागाचे या भागाकडे लक्ष 
पंचवटी- गोदावरीनगर, गणेशवाडी, श्रध्दा लॉन्स, चतु:संप्रदाय आखाडा, पुरिया रोड, नारोशंकर मंदिर, सरदार चौक, पंचवटी, चिंचबन, कबुतरखाना, मखमलाबादनाका. 
पूर्व - नासर्डी नदी परिसर, मुंबई नाका, भांडी बाजार, सराफ बाजार, नेहरू चौक, गाडगे महाराज धर्मशाळा परिसर, टाळकुटे पुलाजवळील वस्ती, काझी गढी, म्हसोबावाडी. 
पश्‍चिम- गंगावाडी, जोशीवाडा, घारपुरे घाट, मल्हारखाण, सुंदर नारायण मंदिर परिसर, रविवार कारंजा, तेली गल्ली, दत्तवाडी, स्वामी नारायण कोट, मंगल लेन, चित्तपावन कार्यालय, गायधनी लेन, कापड बाजार, बोहोरपट्टी, दिल्ली दरवाजा, बागडे लेन, पगडबंद लेन, ओकाची तालीम, भागवत तबेला, नवा दरवाजा, सोमवार पेठ, तिवंधा, गुलालवाडक्ष, मोदकेश्वर मंदीर. 
नाशिकरोड - चेहडी स्मशानभुमीजवळ, साठेनगर, आम्रपाली झोपडपट्टी, सुंदरनगर, नवलेचाल. 
सिडको- नासर्डी नदीलगतचा परिसर, यमुनानगर. 
सातपूर- आनंदवल्ली, संत आसाराम बापू आश्रम परिसर, महादेववाडी, जगतापवाडी, कांबळेवाडी, गौतमनगर, आयटीआयपुल. 

आपत्ती संपर्क साधण्याचे आवाहन 
सहा विभागातील अग्निशमन केंद्राबरोबरचं 101 क्रमांकावर आपत्ती काळात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त पुर्व विभागिय कार्यालय (2504233), पश्‍चिम (2570493), पंचवटी (2513490), सातपूर (2350367), सिडको (2390768) व नाशिकरोड (2460234) विभागात संपर्क साधता येणार आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com